शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

ठाणे महापालिका हद्दीत कोरोना चाचण्यांचे प्रमाण राज्यापेक्षा तिप्पट, विपिन शर्मा यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 05:14 IST

CoronaVirus News in Thane : प्रत्येक दिवशी ठाण्यात अँटिजन तसेच आरटीपीसीआर अशा मिळून साडेपाच हजारांच्या घरात चाचण्या होत आहेत.

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात जुलैपासून वाढवलेल्या कोरोना चाचण्यांचे प्रमाण हे अजूनही कायम असून शहरातील आजच्या लोकसंख्येनुसार १० लाख नागरिकांच्या मागे शहरात तब्बल तीन लाख ४४ हजार चाचण्या होत आहेत. हे प्रमाण राज्यापेक्षाही तिपटीहून अधिक आहे. राज्यात १० लाख नागरिकांच्या मागे केवळ ८३ हजार चाचण्या होत असून, चाचण्यांचे हे प्रमाण कायम राहिल्यास २० दिवसांत पॉझिटिव्हिटी दर हा ६ टक्क्यांपेक्षाही खाली येईल, असा विश्वास ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी व्यक्त केला.प्रत्येक दिवशी ठाण्यात अँटिजन तसेच आरटीपीसीआर अशा मिळून साडेपाच हजारांच्या घरात चाचण्या होत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात चाचण्या होऊनही १२ मार्चपासून ते आतापर्यंतचा पॉझिटिव्हिटी रेट हा ६.५६ टक्के इतका आहे. तो ५ ते ६ महिन्यांपूर्वी जवळपास १३ टक्क्यांवर होता. जून महिन्यात शर्मा यांनी ठाणे महापालिका आयुक्त पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा सर्वांत आधी त्यांनी चाचण्या वाढविण्यावरच भर दिला. शहरात आतापर्यंत सात लाख ८७ हजार ९८६ चाचण्या केल्या आहेत. हे प्रमाणदेखील राज्याच्या तुलनेत जास्त आहे.२०११च्या जनगणनेनुसार १० लाख नागरिकांच्या मागे राज्यात चाचण्यांचे प्रमाण हे केवळ ९३ हजार २२५ इतके आहे. ते ठाणे महापालिका हद्दीत चार लाख ३० हजार ९३६ इतके आहे. तर २०२०च्या लोकसंख्येनुसार राज्यात १० लाख नागरिकांच्या मागे हेच प्रमाण ८३ हजार ५८० इतके असून, ठाणे शहरात मात्र तीन लाख ४४ हजार २२७ इतके आहे. राज्याच्या तुलनेत ते तीन पट जास्त आहे, असे ते म्हणाले.

शहरात रुग्णांच्या डिस्चार्जचे प्रमाणही वाढले आहे. सध्या ४२० रुग्णांना घरी सोडले जात आहे. हे प्रमाण ९६.२३ टक्के आहे. येत्या चार दिवसांत ते ९८ टक्क्यांवर जाण्याची शक्यता असून, सध्या ८२९ ॲक्टिव्ह केसेस असल्याची माहिती डॉ. शर्मा यांनी दिली. ॲक्टिव्ह केसेसचे प्रमाण अतिशय कमी झाल्याने आता शहरातील कोविड हॉस्पिटलचे बेडदेखील रिकामे आहेत. आजघडीला तीन हजार ५७७ बेड उपलब्ध असून केवळ ७६२ बेडवर रुग्ण आहेत. उपलब्ध ४५० आयसीयू बेडपैकी २४४ बेड रिकामे आहेत, तर व्हेंटिलेटरही १९० पैकी १३४ उपलब्ध आहेत. ऑक्सिजनचा पुरवठाही मुबलक आहे. तो १३०० टन उपलब्ध असून केवळ २१५ टन ऑक्सिजनची सध्या मागणी आहे, असे डॉ. शर्मा म्हणाले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे