गतिमंद तरुणीवर बलात्कार, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

By धीरज परब | Updated: April 18, 2024 20:01 IST2024-04-18T20:01:15+5:302024-04-18T20:01:25+5:30

सदर गतिमंद मुलगी मानसिक रुग्ण असल्याची कल्पना असून देखील तिच्या अजाणतेपणाचा व असहायतेचा गैरफायदा घेऊन खलील याने  फेब्रुवारी २०२३ ते एप्रिल २०२४ या काळात तिच्यावर सातत्याने बलात्कार केला .

Violent young woman raped, case registered against the accused | गतिमंद तरुणीवर बलात्कार, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

गतिमंद तरुणीवर बलात्कार, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

मीरारोड - मीरारोडच्या काशीगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ३२ वर्षीय गतिमंद तरुणीवर सातत्याने बलात्कार करून तिला गरोदर करणाऱ्या  खलील अहमद अब्दल्ला ( वय ३५ वर्ष ) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . 

सदर गतिमंद मुलगी मानसिक रुग्ण असल्याची कल्पना असून देखील तिच्या अजाणतेपणाचा व असहायतेचा गैरफायदा घेऊन खलील याने  फेब्रुवारी २०२३ ते एप्रिल २०२४ या काळात तिच्यावर सातत्याने बलात्कार केला . तिच्याशी शारीरिक संबंध ठेऊन तिला गरोदर केले . मुलगी गरोदर राहिल्याचे लक्षात आल्या नंतर तिच्या वडिलांच्या फिर्यादी वरून पोलिसांनी १७ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला आहे . या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे हे तपास करत आहेत. आरोपीचा पत्ता आदी माहिती नसल्याने पोलीस त्याचा विविध माहितीच्या आधारे शोध घेत आहेत. 

Web Title: Violent young woman raped, case registered against the accused