शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीचे उल्लंघन: ठाणे ग्रामीण पोलिसांनी तीन दिवसांत केली १५०७ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 00:07 IST

कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी लागू केलेल्या संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या एक हजार ५०७ वाहन चालकांवर ठाणे ग्रामीण पोलिसांनी गेल्या तीन दिवसांमध्ये कारवाई केली आहे. त्यांच्याकडून सुमारे पाच लाख दहा हजार ६०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपाच लाख १० हजारांचा दंड वसूल ३६७ आरोपींवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांनी २४ ते २६ एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये १५०७ वाहन चालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून पाच लाख दहा हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण ठाणे जिल्हयात संचादबंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. ठाणे ग्रामीण भागातील मीरा रोड, भार्इंदर, गणेशपूरी, शहापूर आणि मुरबाड या पाचही उपविभांमधील १७ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळया ठिकाणी २४ ते २६ एप्रिल २०२० या कालावधीमध्ये विनाकारण रस्त्यावर फिरणाºया १५०७ चालकांवर कारवाई केली आहे. त्यांच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करुन दंडही वसूल केला आहे. दरम्यान, संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी या तीन दिवसांच्या काळात ३६७ आरोपींविरुद्ध ५५ गुन्हे नोंदविण्यात आले. त्यांच्याकडूनही स्थानिक पोलिसांनी २३ वाहने जप्त केली. याशिवाय, कोरोनाच्या संदर्भातील अफवा पसरविणाºया सहा जणांविरुद्ध नयानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कोणीही अनावश्यक घराबाहेर पडू नये, संचारबंदीचे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा ठाणे ग्रामीण पोलिसांनी दिला आहे.

 

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस