शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

दादांचा तो हुंदका म्हणजे नाटक, विनोद तावडे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 02:13 IST

कधी दादा रागावतो तर कधी दादा हुंदका काढतो. पण, हे नाटक आहे. चॅनलवर जे दाखवतात, त्यातील १०० टक्के खरंच असते, असे नाही.

ठाणे : कधी दादा रागावतो तर कधी दादा हुंदका काढतो. पण, हे नाटक आहे. चॅनलवर जे दाखवतात, त्यातील १०० टक्के खरंच असते, असे नाही. आपल्या मनावर व्हिज्युअल इफेक्टचा जास्त परिणाम होत असतो. त्यामुळे दिसते तसे नसते म्हणूनच जग फसते, असा टोला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नाव न घेता अजित पवार यांना लगावला. युवकांना राजकारणात येण्याचे तसेच डोळसपणे मतदान करण्याचे आवाहन करून या क्षेत्रात सगळे वाईटही नाही आणि चांगलेही नाही.सगळ्याच पक्षांत चांगली-वाईट माणसे असल्याचे ते म्हणाले. भाजपा युवा मोर्चातर्फे केबीपी महाविद्यालयात युवकांशी संवाद साधणाऱ्या कॉफी विथ युथ या कार्यक्रमाचे सोमवारी आयोजन केले होते. यावेळी तावडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन संवाद साधला. राजकारणात कोणाला यायचे? त्यांच्या या प्रश्नावर कमी विद्यार्थ्यांनी हात वर केले, तेव्हा त्यांनी सध्याच्या राजकारणावर बोट ठेवून नामोल्लेख टाळूना पवार यांना टोला लगावला. ३७० कलमचा कित्ता तावडे यांच्याकडूनही आजच्या कार्यक्रमात गिरवण्यात आला.विद्यापीठाचा अभ्यासक्रम अपडेटेड नाही, या प्रश्नावर उत्तर देताना येत्या दोन वर्षांत अपडेटेड अभ्यासक्रम मिळणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. पेपर रिचेकिंग होऊन आला की, जास्त मार्क्स मिळतात, यावर विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तरले की, पेपर तपासणारा प्राध्यापक हादेखील माणूस आहे. त्याच्याकडूनही कधीकधी चूक होते, अशी सारवासारव केली. तसेच, रिचेकिंग हे वेळेत व्हावे, यासाठी विद्यापीठ प्रयत्न करीत असते. त्यांना उत्तरपत्रिका दाखवावी, ज्यात त्यांना काय चुकले आणि काय बरोबर हे कळेल. पालकांच्या भीतीने रिचेकिंगसाठी हजारोंच्या संख्येने अर्ज येतात.रिचेकिंगनंतर ज्यांचे गुण वाढलेत, त्यांना रिचेकिंगच्या फीमध्ये सवलत देण्याचा विचार केला जाणार असल्याचेही तावडे म्हणाले. मुंबई विद्यापीठ रँकिंगमध्ये का येत नाही, अशा एका विद्यार्थिनीच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, दुर्दैवाने आपले विद्यापीठ रँकिंगचा फॉर्म नीट भरीत नाही.डोनाल्ड ट्रम्पला निवडून यायला मोदींची गरज पडतेअमेरिकेला आपल्याबरोबर मैत्री करावीशी वाटते, असे वक्तव्य तावडे यांनी केले. याआधी असा कार्यक्रम झाला नव्हता. निवडणुकीच्या दृष्टीने ठिकठिकाणी आमदार, खासदार युवकांच्या भेटीला जात असून त्यांच्या मनात काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे भाजपा युवा मोर्चातर्फे सांगण्यात आले. यावेळी निवडणूक आयोगाचे अधिकारी मात्र यावेळी दिसले नाहीत. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Vinod Tawdeविनोद तावडे