गाव स्वच्छ सुंदर करण्यासाठी गावकऱ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 11:45 PM2021-10-02T23:45:07+5:302021-10-02T23:45:55+5:30

Thane : माझं गाव हागणदारी मुक्त अधिक बनविण्यासाठी सहकार्य करेन, या आशयाची शपथ घेऊन गाव स्वच्छ सुंदर बनविण्याचा निर्धार शनिवारी जिल्ह्यातील गावकऱ्यांनी केला. तर जिल्ह्यात विविध ठिकाणी 'महा श्रमदान' करण्यात आले. 

The villagers took an oath of cleanliness to make the village clean and beautiful | गाव स्वच्छ सुंदर करण्यासाठी गावकऱ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ

गाव स्वच्छ सुंदर करण्यासाठी गावकऱ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ

googlenewsNext

ठाणे :  राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि स्वच्छ ही सेवा अभियानाच्या निमित्ताने माझे गाव अधिक स्वच्छ, सुंदर ठेवेन, उघड्यावर कुठेही घाण होऊ देणार नाही.स्वच्छतेतूनच गावात समृध्दि येण्यासाठी मी सांडपाण्याचे आणि घनकचऱ्याचे  व्यवस्थापन करेन. ओला आणि सुका कचऱ्याचे घरातच विलगीकरण करेन. माझं गाव हागणदारी मुक्त अधिक बनविण्यासाठी सहकार्य करेन, या आशयाची शपथ घेऊन गाव स्वच्छ सुंदर बनविण्याचा निर्धार शनिवारी जिल्ह्यातील गावकऱ्यांनी केला. तर जिल्ह्यात विविध ठिकाणी 'महा श्रमदान' करण्यात आले. 

यावेळी दरम्यान पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आज संबोधित केले. हा स्वच्छता संवादाचा कार्यक्रमही गावकऱ्यांना दाखविण्यात आला.यावेळी भुवन ग्रामपंचायतीने प्लॅस्टिकमुक्त करण्याचा संकल्प केला. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या कक्ष अधिकारी स्मिता राणे यांनी कशेळी ग्रामपंचायतीला भेट देऊन गावातील सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन मार्गदर्शन केले. 

स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून जिल्हात देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने विविध स्वच्छता विषयक उपक्रम राबवण्यात येत आहेत. यासाठी जिल्हा कक्षातील ज्ञानेश्वर चंदे, दत्तात्रय सोळंके,  राजेश वाघे  ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Web Title: The villagers took an oath of cleanliness to make the village clean and beautiful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे