उल्हासनगरात गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त; ४ लाखाचा गावठी दारूचा साठा जप्त

By सदानंद नाईक | Updated: February 4, 2023 16:08 IST2023-02-04T16:07:14+5:302023-02-04T16:08:31+5:30

पोलिसांनी तब्बल १ लाख २ हजार रुपये किंमतीचा दारूचा कच्चा साठा जप्त करून उध्वस्त केला. दर्शन वायले याच्यावर गुन्हा दाखल केला. 

village liquor kiln destroyed; 4 lakh village liquor stock seized In Ulhasnagar | उल्हासनगरात गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त; ४ लाखाचा गावठी दारूचा साठा जप्त

उल्हासनगरात गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त; ४ लाखाचा गावठी दारूचा साठा जप्त

उल्हासनगर : हिललाईन पोलिसांनी माणेरे गावातील गावठी दारूची हातभट्टी बुधवारी दुपारी उध्वस्त केल्यानंतर, शहर गुन्हे अन्वेषण विभागाने द्वारलीगाव हद्दीतील गावठी दारूचा हातभट्टी अड्डा मध्यरात्री उद्धवस्त करून २ लाख ८१ हजार किंमतीचा साठा जप्त केला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसार गावात गावठी दारूचा हातभट्टी अड्डा असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर, बुधवारी दुपारी पोलिसांनी गावाच्या नंदाई चाळ येथील झाडाझुडुपा मध्ये सुरू असलेल्या हातभट्टी गावठी दारूच्या अड्ड्यावर धाड टाकली. कारवाई वेळी हातभट्टीवर काम करणारे पळून गेले. पोलिसांनी तब्बल १ लाख २ हजार रुपये किंमतीचा दारूचा कच्चा साठा जप्त करून उध्वस्त केला. दर्शन वायले याच्यावर गुन्हा दाखल केला. 

हिललाईन पोलीस ठाण्याच्या कारवाईनंतर शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बुधवारी रात्री १ वाजण्याच्या दरम्यान द्वारली गाव हद्दीतील शेत शिवारातील हातभट्टी गावठी दारू अड्ड्यावर धाड टाकून तब्बल २ लाख ८१ हजाराचा गावठी दारूचा साठा उध्वस्त केला. या कारवाईने हातभट्टी गावठीघटकांचे धाबे दणाणले आहे. याप्रकरणी लहू हाल्या म्हात्रे यांच्यासह तिघांवर गुन्हे दाखल केला. घटनास्थळावरून पालयांन केलेल्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. शहरातील बहुतांश झोपडपट्टीत गावठी दारूचे अड्डे असून त्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Web Title: village liquor kiln destroyed; 4 lakh village liquor stock seized In Ulhasnagar