विजय कासटला न्यायालयीन कोठडी
By Admin | Updated: September 10, 2015 02:41 IST2015-09-10T02:41:55+5:302015-09-10T02:41:55+5:30
पेण येथील बाळगंगा सिंचन गैरव्यवहार प्रकरणी अटक केलेल्या तत्कालीन शाखा अभियंता विजय कासटला ठाणे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

विजय कासटला न्यायालयीन कोठडी
ठाणे : पेण येथील बाळगंगा सिंचन गैरव्यवहार प्रकरणी अटक केलेल्या तत्कालीन शाखा अभियंता विजय कासटला ठाणे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याचबरोबर निसारच्या आईवडिलांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज त्यांनी चर्चाअंती मागे घेतला आहे. त्यांना अटक करण्यापूर्वी ७२ तासांची नोटीस बजावण्याचे आदेश त्या वेळी न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहेत. तसेच निसारच्या हस्ताक्षरांचे नमुने घेण्यासही परवानगी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
३ सप्टेंबर रोजी कासटसह खत्री बंधूंना मुंबईतून ठाणे लाचलुचपत विभागाने अटक केली होती. कासटची पोलीस कोठडी बुधवारी संपल्याने त्याला ठाणे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. बांबर्डे यांच्यासमोर हजर केले होते. त्या वेळी त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. तसेच अटक करण्यात आलेला कंत्राटदार निसारची आई जुतैन आणि वडील फतेह यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात झालेल्या चर्चेअंती त्यांनी अर्ज मागे घेतला. त्या दोघांना अटक करायची असेल तर त्यांना ७२ तासांची नोटीस देण्याचे आदेश या वेळी न्यायालयाने पोलिसांना दिले. त्यांना पुन्हा अटकपूर्व जामीन अर्ज करता येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.