वाड्यात विद्यार्र्थिनीचा विनयभंग

By Admin | Updated: May 13, 2016 02:02 IST2016-05-13T02:02:27+5:302016-05-13T02:02:27+5:30

एका क्लासमध्ये शिकणारी विद्यार्थीनी मधल्या सुट्टीत आपल्या मैत्रिणीसोबत नाश्ता करायला गेली असता ओळखीच्या विवेक दाभाडे या तरुणाने तिचा विनयभंग केल्याचा गुन्हा वाडा

Vidyarathini's molestation in the castle | वाड्यात विद्यार्र्थिनीचा विनयभंग

वाड्यात विद्यार्र्थिनीचा विनयभंग

वाडा : एका क्लासमध्ये शिकणारी विद्यार्थीनी मधल्या सुट्टीत आपल्या मैत्रिणीसोबत नाश्ता करायला गेली असता ओळखीच्या विवेक दाभाडे या तरुणाने तिचा विनयभंग केल्याचा गुन्हा वाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
वाडा शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकत असणारी १५ वर्षीय विद्यार्थीनी एका क्लासच्या व्हेकेशन बॅचमध्ये शिकत आहे. गुरूवारी १० वाजण्याच्या सुमारास ती आपल्या मैत्रिणीसोबत खंडेश्वरी नाका येथील हॉटेलात नाश्ता करायला गेली असता सहयोगनगर येथे राहणारा विवेक दाभाडे हा तरुण तेथे आला. त्याने या विद्यार्थीनीला आवाज देऊन शेजारी असणाऱ्या बिल्डिंगखाली नेऊन काही बोलायचे आहे असे सांगितले. तिने दुर्लक्ष केले असता त्याने तिचा हाताला पकडला.
या घटनेची वाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Vidyarathini's molestation in the castle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.