विद्या पाटील यांच्या कुटुंबीयांना रेल्वेने मदत द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:30 IST2021-06-04T04:30:53+5:302021-06-04T04:30:53+5:30

कल्याण : मोबाइल चोराने केलेल्या हल्ल्यात मरण पावलेल्या कर्मचारी विद्या पाटील यांच्या कुटुंबीयांना रेल्वे प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी ...

Vidya Patil's family should be helped by railways | विद्या पाटील यांच्या कुटुंबीयांना रेल्वेने मदत द्यावी

विद्या पाटील यांच्या कुटुंबीयांना रेल्वेने मदत द्यावी

कल्याण : मोबाइल चोराने केलेल्या हल्ल्यात मरण पावलेल्या कर्मचारी विद्या पाटील यांच्या कुटुंबीयांना रेल्वे प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली. मनसेच्या वतीने आपण पाटील कुटुंबीयांना मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखान परिसरात विद्या त्यांच्या कुटुंबासोबत राहात होत्या. त्यांचे पती, तीन मुली, सासू-सासरे असा परिवार आहे. विद्या साकीनाका परिसरातील खासगी कंपनीतून कामावरून शनिवारी येत असताना कळवा रेल्वेस्थानकात त्यांचा मोबाइल चोरट्याने हिसकावला. चोरासोबत झटापट करताना विद्या यांचा रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाचा त्या आधार होत्या. रेल्वेने त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. पाटील यांच्या मृत्यूस जबाबदार असलेला चोर लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या प्रवासावर बंधने असताना रेल्वे फटालावर पोहोचला कसा, याची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाईची मागणी आमदार पाटील यांनी केली.

---------------------------

वाचली

Web Title: Vidya Patil's family should be helped by railways