शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

त्यांनी अवघ्या २६ हजारांत मारली विधानसभेची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 00:06 IST

माजी आमदार श्रीरंग शिंगे; निवडणूक खर्चावर मर्यादा असणे गरजेचे

आसनगाव : शहापूर विधानसभा मतदारसंघाच्या ४७ वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत केवळ २६ हजार रुपये खर्च करून काँग्रेसचे श्रीरंग शिंगे यांनी आमदारकी मिळवली होती. आताच्या निवडणुकांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. या निवडणूक खर्चावर मर्यादा आणल्याशिवाय गत्यंतर नाही, असे मत शिंगे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्रात १९७२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहापूर विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचे उमेदवार तथा मौजे सारमाळ येथील रहिवासी श्रीरंग रामा शिंगे हे काँग्रेसच्या तिकिटावर उभे होते. त्यावेळी मोजकेच राजकीय पक्ष अस्तित्वात होते. शिंगे यांच्याविरोधात जनसंघ पक्षाचे उमेदवार मोहिनीराज मुळे, शेतकरी कामगार पक्षाचे आंबेकर आणि अन्य दोन असे चार उमेदवार होते. त्यावेळी शहापूर तालुका व मोखाडा तालुक्यातील १९ गावे मिळून शहापूर विधानसभा मतदारसंघ होता.या मतदारसंघातील निवडणुकीत शिंगे यांना केवळ २६ हजार रुपये इतका खर्च आला होता. त्यावेळी फक्त एक जीप घेऊन मतदारसंघात प्रचारासाठी फिरल्याचे शिंगे सांगतात. विशेष म्हणजे त्याच काळात देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यामुळे पाच वर्षे उलटूनही महाराष्ट्र सरकार बरखास्त केले नव्हते. त्यावेळी वसंतराव नाईक यांचे सरकार जवळपास सहा वर्षे चालले होते. त्यामुळे शिंगे यांनाही शहापूर तालुक्यात सहा वर्षे काम करायला मिळाले होते. सध्या माजी आमदार म्हणून ५० हजार रुपये पेन्शन, मोफत प्रवास आणि वैद्यकीय उपचारांसाठी वर्षाकाठी एक लाख रुपयांच्या सुविधा शासनाकडून मिळतात. विधानसभा सदस्यत्वाचा सहा वर्षांचा कालावधी संपल्यानंतर पक्षाने दुसऱ्यांदा तिकीट देऊ करूनही शिंगे यांनी ते नाकारले होते. त्यानंतर, पुन्हा कोणतीच निवडणूक त्यांनी लढवली नाही. मी निवडणूक लढवली त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात मोठा फरक असला तरी, निवडणुका आदर्श पद्धतीने व्हायला हव्यात. निवडणुकीत होणारी कोट्यवधींची उलाढाल कुठेतरी थांबायला हवी.काँग्रेसचा विक्रम मोडलेला नाही१९७२ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण २७० जागा होत्या. त्यावेळी काँग्रेसने २२२ जागा जिंकल्या होत्या.तत्पूर्वी १९६७ च्या निवडणुकीत काँग्रेसने २०२ जागा जिंकण्याचा विक्रम नोंदवला होता. काँग्रेसचा हा विक्रम आजवर कुणी मोडला नाही, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

टॅग्स :congressकाँग्रेस