शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan sabha 2019 : निष्ठावंताची मागणी हवेतच विरली, ठाण्यासाठी सेनेने जोर लावलाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 02:05 IST

एकीकडे ठाणे शहर विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असतानाही त्याची मागणी शिवसेनेने भाजपकडे केलीच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठाणे : एकीकडे ठाणे शहर विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असतानाही त्याची मागणी शिवसेनेने भाजपकडे केलीच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केवळ कल्याण पश्चिमसाठीच श्रेष्ठींनी फिल्डिंग लावली होती आणि तो मतदारसंघ मिळविण्यात पक्षाला यश आले आहे. मात्र, ठाण्यातील निष्ठावान शिवसैनिकांच्या तोंडाला वरिष्ठांनी अखेर पाने पुसल्याचे स्पष्ट झाले आहे.ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा गड आहे. मात्र, मागील निवडणुकीत केलेल्या चुकीमुळे हा गड शिवसेनेच्या हातून निसटल्याचे शिवसैनिक सांगत आहेत. त्यामुळे तो मिळावा म्हणून त्यांनी आपली मागणी लावून धरली आहे. हा मतदार संघ शिवसेनेला मिळावा अशी मागणी शिवसैनिक करीत असले तरी वरिष्ठ पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी या मतदारसंघासाठी चर्चाच केली नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. त्यांची चर्चा ही केवळ कल्याण पश्चिम मतदारसंघासाठी होती, त्यानुसार त्यांनी हा मतदारसंघ मिळविला आहे.कल्याण पश्चिम व ठाणे शहरात भाजपचाच आमदार असतांना जर शिवसेनेने सहज कल्याण पश्चिम आपल्या ताब्यात घेतले आहे. त्यामुळे ठाणे विधानसभाही शिवसेनेला सहज मिळू शकत होती. मग वरिष्ठांनी ही चूक का केली, असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.|एकीकडे शिवसेनेने कल्याण पश्चिमच्याच दाव्यावर ठाणे हे भाजपला सोडल्याचेही आता स्पष्ट झाले आहे. ठाणे मतदार संघातून सभागृह नेते नरेश म्हस्के, संजय भोईर, रवींद्र फाटक आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांची नावे आघाडीवर होती. म्हस्के यांना पक्षाने कमिटमेंटही दिली होते. असे असताना मग कल्याण पश्चिमच का ठाणे का नाही, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. वास्तविक पाहता, या सर्वांचाच श्रेष्ठींनी पत्ता कट केला असून यापुढेही हा मतदारसंघ भाजपच्याच वाटेला असेल हेही या निमित्ताने अधोरेखीत झाले आहे.राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडे लक्षठाणे विधानसभा मतदारसंघ हा सुशिक्षित, उच्चभ्रू लोकवस्तीचा मतदारसंघ आहे. या परिसरातील मतदारांवर २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याचा प्रभाव होता. त्यामुळेच शिवसेनेच्या उमेदवारावर मात करून भाजपने येथे घवघवीत यश मिळवले.भाजपतर्फे ठाणे शहर मतदारसंघातून संजय केळकर यांना पुन्हा संधी दिली गेली आहे. मनसेने अविनाश जाधव यांना रिंगणात उतरवले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस कोणती भूमिका घेते, येथून कुणाला उमेदवारी देते, यावर येथील लढतीचे चित्र अवलंबून असेल.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019thane-acठाणेShiv Senaशिवसेना