शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Vidhan sabha 2019 : बड्या नेत्यांनी नाईक यांचा बेलापूरमधून पत्ता कापला, सेना-भाजपमधील नेत्यांची खेळी''

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 02:17 IST

भाजपमध्ये ५५ नगरसेवकांची कुमक घेऊन दाखल झालेल्या गणेश नाईक यांच्या उमेदवारीची पहिल्या यादीत घोषणा झालेली नाही.

- अजित मांडकेठाणे : भाजपमध्ये ५५ नगरसेवकांची कुमक घेऊन दाखल झालेल्या गणेश नाईक यांच्या उमेदवारीची पहिल्या यादीत घोषणा झालेली नाही. एकाच घरातील दोघांना उमेदवारी देण्याची भाजपमध्ये पद्धत नाही, अशा चर्चा ठाणे जिल्ह्यात सोशल मीडियावर सुरु असल्याने भाजप व शिवसेनेतील बड्या नेत्यांनी गणेश नाईक यांचे प्रस्थ वाढू नये याकरिता खेळी केल्याची चर्चा सुरु झाली आहे. नाईक यांच्या प्रवेशामुळे ठाण्यातील शिवसेनेचे नेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये यापूर्वी आलेले नेते आणि भाजपमधील जुनेजाणते अस्वस्थ होते.ठाणे शहर मतदारसंघ शिवसेना आपल्याकडे घेणार या चर्चेला संजय केळकर यांच्या उमेदवारीमुळे पूर्णविराम मिळाला आहे. मात्र या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याकरिता इच्छुक असलेल्या नरेश म्हस्के यांच्या स्वप्नावर बोळा फिरला आहे. कल्याण पश्चिममध्ये नरेंद्र पवार यांना भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा व ठाणे जिल्ह्यातील शिवसेना-भाजप नेत्यांच्या अंडरस्टँडींगचा धक्का बसल्याची चर्चा आहे.काही दिवसांपूर्वी नाईक यांनी भाजपचे कमळ हाती घेतले होते. त्यानंतर ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातून अनुक्रमे संदीप नाईक आणि गणेश नाईक यांना उमेदवारी दिली जाईल, असे बोलले जात होते. बेलापुरच्या विद्यमान आ. मंदा म्हात्रे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा जोर धरू लागली होती. परंतु भाजप आणि शिवसेनेतील काही नेत्यांना नाईक निवडून आले आणि त्यांच्या खांद्यावर जिल्हा नेतृत्वाची किंवा पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाण्याची भीती वाटत होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वी नाईकांना गडकरी रंगायतन येथे झालेल्या कार्यक्रमापासून लांब ठेवले होते. येथूनच नाईकांच्या विरोधात भाजपमधील काही प्रस्थापित मंडळी सक्रिय झाल्याचे दिसून आले. भाजपच्या पहिल्या यादीत बेलापूर मतदारसंघातून पुन्हा मंदा म्हात्रे यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. आता नाईकांना त्यांच्या कट्टर विरोधक म्हात्रे यांचा प्रचार करावा लागणार आहे. एकाच घराण्यातील दोनजणांना तिकीट देता येत नाही, असे कारण भाजपकडून नाईक यांना उमेदवारी नाकारताना दिल्याची चर्चा आहे.ठाणे शहर मतदारसंघातून नरेश म्हस्के यांना उमेदवारीचे आश्वासन दिले होते. मात्र म्हस्के यांच्या स्वप्नांवर बोळा फिरला. म्हस्के यांचे नेतृत्व मोठे झाले तर डोकेदुखी वाढण्याची भीती हेच हा मतदारसंघ शिवसेनेकडे खेचून न घेण्याचे कारण असू शकेल, असे बोलले जाते. त्यामुळे म्हस्के यांची वाटचाल गोपाळ लांडगे यांच्या मार्गाने होणार, अशी कुजबुज सेनेत आहे.ठाणे शहर ऐवजी शिवसेनेने कल्याण पश्चिम मतदारसंघ आपल्याकडे घेतला आहे. विनोद तावडे यांचे नरेंद्र पवार यांच्याशी घनिष्ट संबंध असल्याने भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने पवार यांचे तिकीट कापून अप्रत्यक्षपणे तावडे यांना शह दिल्याचे बोलले जात आहे. कल्याण पश्चिममधून प्रकाश पाटील यांचे नाव शिवसेनेकडून जवळपास निश्चित झाले आहे. मात्र ते भिवंडीतील असल्याने त्यांना सेनेच्या काही मंडळींनी विरोध केला आहे. या मतदारसंघातून ११ जण इच्छुक आहेत. मात्र पाटील हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असल्यानेच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे स्पष्ट संकेत आहेत. कल्याण पश्चिम शिवसेनेकडे आल्याने येथील खा. शिंदे यांचे स्थान मजबूत होणार आहे.नाईक यांच्यापुढे पर्याय कोणते? : गणेश नाईक यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला बेलापूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली नसली तरी, ठाणे जिल्ह्यातील कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून त्यांची इच्छा असल्यास उमेदवारी दिली जाऊ शकते. तसे ्रझाल्यास जितेंद्र आव्हाडांसमोर कडवे आव्हान राहील. याखेरीज भाजपकडून नाईक यांना विधानपरिषदेवरही संधी दिली जाऊ शकते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019thaneठाणेGanesh Naikगणेश नाईक