शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan sabha 2019 : कल्याण पूर्वेत बंडखोरी अटळ? बोडारे अपक्ष लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 01:05 IST

कल्याण पूर्व मतदारसंघ मिळावा, अशी मागणी येथील शिवसैनिकांनी केली होती. परंतु, हा मतदारसंघ भाजपकडे गेल्याने नाराज झालेल्या शिवसैनिकांनी अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

कल्याण : कल्याण पूर्व मतदारसंघ मिळावा, अशी मागणी येथील शिवसैनिकांनी केली होती. परंतु, हा मतदारसंघ भाजपकडे गेल्याने नाराज झालेल्या शिवसैनिकांनी अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी एका बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. उल्हासनगर महापालिकेचे विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. परंतु, बोडारे यांनी निर्णय झाला की सांगतो, असे स्पष्टीकरण देत बंडखोरीबाबत चुप्पी साधली आहे.कल्याण पूर्व मतदारसंघात २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत अपक्ष निवडून आलेल्या गणपत गायकवाड यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. परंतु, हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, अशी मागणी येथील शिवसैनिकांनी केली होती. याठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व असल्याकडे लक्ष वेधण्यात आले होते. उल्हासनगर महापालिकेतील विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, माजी नगरसेवक नवीन गवळी, प्रकाश तरे, नगरसेवक महेश गायकवाड, माजी महापौर तथा विद्यमान ज्येष्ठ नगरसेवक रमेश जाधव हे निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र, हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.प्रकाश तरे यांनी मंगळवारी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. ते पूर्वेतून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून लढण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, मतदारसंघ न मिळाल्याने शिवसेनेच्या नाराज स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आता स्वतंत्रपणे उमेदवार उभा करून बंडाचे निशाण फडकवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी पूर्वेकडील एका शिवसेना शाखेत पार पडलेल्या बैठकीत धनंजय बोडारे हे अपक्ष उमेदवार म्हणून लढतील, यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, यासंदर्भात बोडारे यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता त्यांनी बैठक पार पडल्याचे स्पष्ट करीत निर्णय अद्याप झालेला नाही, तो झाला की कळवतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे.रॅलीकडे लागले लक्ष : या मतदारसंघात शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. अशातच गुरुवारी भाजपचे गणपत गायकवाड हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्त सकाळी ९.३० वाजता रॅली काढण्यात येणार असून, यात शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होतात का, याकडे आता लक्ष लागले आहे. नाराजांची समजूत काढण्यात शिवसेना पक्षश्रेष्ठींना यश येते का, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kalyan-east-acकल्याण पूर्व