शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan sabha 2019 :...अन्यथा नरेंद्र पवार अपक्ष लढणार, कार्यकर्त्यांचा १२ तासांचा अल्टीमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 01:58 IST

शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपात कल्याण पश्चिम मतदारसंघाची जागा शिवसेनाला सोडण्यात आली आहे.

कल्याण : शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपात कल्याण पश्चिम मतदारसंघाची जागा शिवसेनाला सोडण्यात आली आहे. ही जागा भाजपला पुन्हा देण्याचा विचार पक्षाने करावा. बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत हा निर्णय न घेतल्यास पक्ष कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार आमदार नरेंद्र पवार हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करतील, असा अल्टीमेटम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.शिवसेनेला ही जागा सोडल्याने पवार यांच्या कार्यालयासमोर मंगळवारी सकाळीच भाजप कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार जमले. पक्षाध्यक्षांना त्यांनी राजीनामे पाठवून दिले आहेत. सकाळच्या घडोमोडीनंतर सायंकाळी भाजपने महाजनवाडी सभागृहात मेळावा घेतला. या वेळी नाराज पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि आमदार उपस्थित होते. या मेळाव्यात नाराजांचा रेटा पाहता कल्याण पश्चिमेतून पवार यांनी अपक्ष निवडणूक लढवावी, अशी मागणी आहे. पक्षाच्या विरोधात कृती करण्याची मनस्थिती नसल्याचे स्पष्ट करत पवार यांनी, कार्यकर्त्यांचा रेटा पाहता अपक्ष उमेदवार म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरणार आहोत. भाजपचा मतदारसंघ राखण्यासाठी ही निवडणूक लढविणार असल्याचा निर्धार पवार यांनी व्यक्त केला आहे.उपमहापौर झाल्या भावूकभाजपच्या या मेळाव्यास कल्याण-डोंबिवलीच्या उपमहापौर उपेक्षा भोईर यादेखील उपस्थित होत्या. मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करीत असताना पक्षाची जागा शिवसेनेला गेल्याचे कळताच पायाखालची जमीन सरकली, हे सांगत असताना त्या भावूक झाल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. हुंदका त्यांना आवरता आला नाही. त्यामुळे त्या बोलताना जरा थांबल्या.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kalyan-west-acकल्याण पश्चिम