Thane Bus Driver Attack News: चालक सीटवर बसलेला असतानाच चार-पाच जण बसमध्ये घुसले. दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी डोक्यात मारले. त्यानंतर त्याचे कपडे फाडले आणि त्याला जबरदस्ती खेचत खाली नेले आणि लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात चालक गंभीर जखमी झाला आहे.
मिरा-भाईंदर महापालिका परिवहन विभागाच्या बस चालकावर हा हल्ला करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी कोपरीमध्ये ही घटना घडली. शंकर गजानन चव्हाण असे हल्ल्यात जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे.
बसचालकाला मारहाण, वादाचे कारण काय?
कोपरीकडे येत असताना एका स्कुटीचालकाने बसला कट मारला. त्यावरून बस चालक शंकर चव्हाण आणि स्कुटीचालकामध्ये वाद झाला. बसमधील प्रवाशांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. पण, स्कुटी चालकाने आणखी लोकांना बोलावून घेत बसचा पाठलाग केला.
कोपरी येथे शेवटच्या बसस्थानकावर बस थांबली. त्यावेळी बसमध्ये कुणीही नव्हते, त्याचवेळी स्कुटीचालक त्याच्या साथीदारांसह बसमध्ये घुसला आणि त्यांनी थेट दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. डोक्यात दांड्याने मारले.
कपडे फाडले, रस्त्यावर ओढून मारहाण
आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी बसचालकाचे कपडे फाडले. सगळ्यांनी मिळून त्याला जबरदस्ती बसमधून ओढत खाली नेले. त्यानंतर बसमधून खाली नेल्यावर रस्त्यावर पाडले आणि सगळ्यांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
काही वेळात तिथे पोलीस आले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर चालकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी निलेश शिंदे आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात हत्येचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणण्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्ही व्हिडीओ ताब्यात घेतला असून, आरोपींचा शोध सुरू केला आहे.
Web Summary : A bus driver in Thane was brutally attacked after a minor road incident escalated. The driver, Shankar Chavan, was beaten with sticks and kicked by a group following a dispute with a scooter driver. Police have arrested the accused.
Web Summary : ठाणे में सड़क पर हुई एक मामूली घटना के बाद बस ड्राइवर पर बेरहमी से हमला किया गया। स्कूटर चालक के साथ विवाद के बाद शंकर चव्हाण नाम के ड्राइवर को लाठियों से पीटा गया और लात मारी गई। पुलिस ने आरोपियों को गिरफ्तार कर लिया है।