शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

कल्याण-शहापूरमध्ये महामार्गासाठी जाणार २७ हजार ४६३ झाडांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 12:51 AM

मुंबई आणि नागपूर या महानगरांना जोडणाऱ्या बहुचर्चित समृद्धी मार्गाच्या बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि शहापूर या दोन्ही तालुक्यांतील सुमारे २७,४६३ झाडांचा बळी घेणार आहे.

- नारायण जाधव ठाणे : एकीकडे राज्य शासनाने शतकोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत राज्यात यंदा ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले असताना दुसरीकडे मुंबई आणि नागपूर या महानगरांना जोडणाऱ्या बहुचर्चित समृद्धी मार्गाच्या बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि शहापूर या दोन्ही तालुक्यांतील सुमारे २७,४६३ झाडांचा बळी घेणार आहे.ठाणे हा राज्यातील वनाच्छादित जिल्ह्यांपैकी एक असून मुंबईनजीकचा जिल्हा तो म्हणून तो ओळखला जातो. राजधानी मुंबईच्या जवळ असल्याने या जिल्ह्यातील शेतजमिनीसह वनजमीन वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी संपादित करण्यात येत असून त्यात येत्या काळात अनेक नियमांना डावलून लाखो झाडांचा बळी जाणार असल्याने वन्यप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.जिल्ह्यातून जेएनपीटी-दिल्ली डेडिकेट फे्रट कॉरिडोर, मुंबई-बडोदरा महामार्ग, विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोर, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसह शाई, काळू ही धरणे आणि संजय गांधी उद्यानातून जाणारा ठाणे-बोरिवली मार्ग व विविध इतर छोट्यामोठ्या प्रकल्पांसाठी जमीन संपादित करण्यात येत आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर-अंबरनाथ-बदलापूर, नवी मुंबई या शहरांत त्या महापालिकांसह एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि एमआयडीसीकडून अनेक प्रकल्प नजीकच्या काळात आकार घेत आहेत. या सर्व प्रकल्पांसाठी लाखो झाडांचा बळी जाणार आहे. कारण, यातील बहुतेक प्रकल्प जंगलपट्ट्यासह आरक्षित वनांतून जाणार आहेत. त्यांच्या उभारणीसाठी ही वृक्षकत्तल करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक झाडे धरण प्रकल्पांसह बुलेट ट्रेन आणि मुंबई-बडोदरा महामार्ग व विरार-अलिबाग कॉरिडोरमध्ये बाधित होणार आहेत.आता समृद्धी महामार्गासाठी पहिल्या टप्प्यात शहापूर तालुक्यातील खर्डी येथील २४९९, धसई- ३८८८, सरळांबे, अर्जुनाली, लाहे, खुटाडी, अंबजे या गावांतील ४४३१, शेरे २२०४, शाई ४९४०, बिरवाडी ५६७८ असा वृक्षांचा बळी जाणार आहे. फळेगाव, उशीद, नडगाव, उटने या गावांतील ३८२३ झाडांच्या कत्तलीसाठी निविदा मागवल्या आहेत.>कायदा धाब्यावर,वन्यप्राण्यांचे नुकसानही गुलदस्त्यातएवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करताना वनविकास महामंडळानेच वृक्षतोडीसंदर्भातील कायद्यांना धाब्यावर बसवले आहे. यात कोणती व कशा प्रकारची झाडे जाणार आहेत, यात दुर्मीळ, अतिदुर्मीळ प्रजाती किती आहेत, त्यांचे टॅगिंग केले आहे किंवा नाही, याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. शिवाय, यातील किती झाडांचे पुनर्रोपण करणार, कुठे आणि कसे करणार, हे गुलदस्त्यात आहे. या वृक्षतोडीमुळे त्यात्या परिसरातील जंगलसंपत्तीसह वन्यप्राण्यांची किती व कशा प्रकारे हानी होणार आहे, त्यांच्या जीवनमानावर त्याचे काय परिणाम होणार आहेत, याबाबतही लपाछपी खेळण्यात आली आहे.