शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण आशा भोसलेंनी केलं मोदी-योगी यांचं कौतुक, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 07:15 IST

चांगले कार्य करून कोणी कधी संपत नाही. शिंदे यांच्या सह मला राज ठाकरे देखील आवडतात त्यांचे बाळासाहेबांसारखे  धारदार बोलणे आहे. देवेंद्र फडणवीस देखील आवडत असल्याचे त्यांनी नमूद केले

प्रज्ञा म्हात्रेठाणे - राजकारणातील माझे आवडते व्यक्ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. मला ते फार आवडतात कारण ते पहाटे उठून योगा करून मग कामाला लागतात दुसऱ्या व्यक्तींवर टीका करत नाही विरुद्ध पक्षाने कितीही आरोप केले तरी ते त्यांना काही बोलत नाहीत. त्यांच्या बोलण्यामध्ये फार आदर असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदीनंतर मला योगीराज फार आवडतात. त्यात मला माझी प्रतिमा दिसते. त्यांच्यात हिम्मत, ताकद आणि स्पष्ट बोलण्याची तयारी आहे अशा शब्दांत अशा शब्दांत ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांनी मोदी आणि योगी यांचे कौतुक केले. 

त्यापुढे म्हणाल्या की, मोदी हे महोदय, कुमार असे शब्द ते वापरतात विरोधी पक्ष कितीही वाईट बोलले तरी मोदी त्यांच्या भाषणातून शब्दच वापरतात. मी खूप वेळा त्यांना भेटले आहे. मला बाळासाहेब ठाकरे देखील फार आवडतात हे सांगताना त्यांच्याशी दोस्ती कशी झाली हा प्रसंग त्यांनी उलगडला. ठाकरे यांच्याबरोबर शेवटपर्यंत माझी दोस्ती होती म्हणून मला ते फार आवडतात. त्यांची छबी तुम्हाला कोणामध्ये दिसते हे विचारल्यानंतर भोसले यांनी "तुम जियो हजारो साल, साल के हो पचास हजार" असे गाणे गात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. शिंदे हे बाळासाहेब यांची छाप असलेले नेते आहेत. जशी बाळासाहेबांनी एकट्याने शिवसेना घडवली तशी शिंदे यांनी परत एकट्याने शिवसेना घडवली आणि मला त्यांचा अभिमान आहे. त्यांनी लोकांच्या बोलण्याला तोंड दिले त्यामुळे ते यशस्वी झाले आणि ते अजून यशस्वी होतील अशा शब्दांनी त्यांना आशीर्वाद देते.

चांगले कार्य करून कोणी कधी संपत नाही. शिंदे यांच्या सह मला राज ठाकरे देखील आवडतात त्यांचे बाळासाहेबांसारखे  धारदार बोलणे आहे. देवेंद्र फडणवीस देखील आवडत असल्याचे त्यांनी नमूद केले. आयुष्यातील राजकारण खूप भयंकर होते हे सांगताना त्या म्हणाल्या की, घरातल्या राजकारणापेक्षा इंडस्ट्री मधील राजकारण भयंकर होते परंतु त्याचा माझ्यावर फारसा परिणाम झाला नाही कारण मी खूप मेहनती होती, वेळ पाळणारी होती. माझा माईक हा माझा देव आहे असे मी ठरवले होते. माझ्या विरुद्ध पुष्कळ लोक उभे राहिले होते पण मी काम संपले की निघून जायची. आपण दुसऱ्याला बोलण्याची ऊर्जा देऊ नये असे मला वाटते. त्या म्हणाल्या की मला काम नसले तर मी जगू शकणार नाही जोपर्यंत मी गाते तोपर्यंत मी जिवंत आहे.

ठाण्यातील डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आनंदोत्सव संगीत समारोह या कार्यक्रमात भोसले यांची मुलाखत अभिजीत खांडेकर यांनी घेतली. यावेळी त्यांनी हिंदी मराठी गाण्यांच्या ओळी देखील सादर केल्या.

टॅग्स :Asha Bhosaleआशा भोसलेNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथRaj Thackerayराज ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे