शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान

By जितेंद्र कालेकर | Updated: January 9, 2026 19:22 IST

घोडबंदर रोडवरील घटनेमुळे कार चालकासह चाैघे जखमी, दाेन तास वाहतूकीला खाेळंबा

ठाणे: ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख जकात नाक्याजवळ घाटाच्या उतरणीवर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दहा माेटारकार, एका रिक्षांसह ११ वाहनांनाएका ४० टनी सिमेंटच्या गाेणी वाहून नेणाऱ्या कंटेनरची जाेरदार धडक बसली. या अपघातामुळे रिक्षा चालक शिवकुमार यादव (५६, रा. काशीमीरा, ठाणे) यांच्यासह चाैघेजण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामुळे ठाणे ते घाेडबंदर आणि घाेडबंदर ते ठाणेया दाेन्ही मार्गावर सुमारे दाेन तास वाहतूकीला खाेळंबा झाला हाेता. जखमींमध्ये रिक्षातील दाेन प्रवाशांचाही समावेश असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

घोडबंदर रोडवरील गायमुख जकात नाक्याजवळ घाेडबंदर ते ठाणे या मार्गावर ठाण्यातून घाेडबंदर, काशीमीरा भागाकडे जाणारी एक माेटारकार चुकीच्या दिशेने गेली. तिच्याच मागे अन्यही काही वाहनांसह रिक्षा चालकांनीही चुकीचा मार्ग निवडला. त्याचवेळी घाेडबंदर ते ठाणे या मार्गावर उतरणीवरुन येणाऱ्या कंटेनरची जाेरदार धडक या वाहनांना बसली. या साखळी अपघातांत शिवकुमार यादव या रिक्षा चालकाच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली. तर तस्कीन शेख (४५) आणि अनिता पेरवाल (४५) तसेच रामबली बाबूलाल (२२, कार चालक ) हे चाैघेजण जखमी झाले.

अपघातग्रस्त वाहने ही दोन्ही वाहिनीवर आल्याची माहिती एका प्रवाशाकडून मिळाल्यानंतर वाहतूक पाेलिस, आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. या विचित्र अपघाताच्या वेळी एका कारचा चालक कारमध्ये अडकला होता. त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. तसेच चाैघा जखमींनाही तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. इतर वाहनांमधून प्रवास करणाऱ्यांनाही किरकोळ दुखापत झाली. ते स्वत: उपचारासाठी रुग्णालयात गेल्याने त्यांची नावे समजू शकली नसल्याचे पाेलिसांनी सांगितले.

अपघातग्रस्त वाहनांधून रस्त्यावर ऑइल मोठ्या प्रमाणात सांडून ते रस्त्यावर पसरले होते. त्या ऑईलवर आपत्ती अग्निशमन दलाच्या जवानांनी माती पसरवून रस्ता सुरळीत केला. अपघातामुळे घाेडबंदर ते ठाणे मार्गावर दीड ते दाेन तासांचा खाेळंबा झाला हाेता. अपघातग्रस्त वाहने रोडच्या बाजूला केल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा झाला. परंतू, त्यानंतरही काही वेळ या मार्गावरुन कुर्म गतीने वाहतूक सुरु हाेती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

वाहनांचा चुराडा -या अपघातात दहा कार, एका रिक्षा आणि एक कंटेनर अशा १२ वाहनांचे नुकसान झाले. यातील काही वाहनांचा अक्षरश: चुराडा झाला. रस्त्यावर वाहनांच्या तुटलेल्या काचांचा खच आणि तेल सांडले होते. गायमुख जकात नाका ते फाऊंटन पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या चालकांचे माेठया प्रमाणात हाल झाले. अपघातानंतर कंटेनर चालक पसार झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Container Hits Vehicles Head-On in Thane; Several Injured

Web Summary : A container truck collided with multiple vehicles near Thane's Ghodbunder Road, injuring four and damaging twelve. Wrong-way driving contributed to the accident. Traffic was disrupted for two hours as emergency services responded, and the container driver fled.
टॅग्स :Accidentअपघातthaneठाणे