भाज्यांचे दर ५० टक्क्यांनी घसरले
By Admin | Updated: November 12, 2016 06:31 IST2016-11-12T06:31:30+5:302016-11-12T06:31:30+5:30
ट्या पैशांअभावी ग्राहकांची रोडावलेली संख्या, घाऊक व किरकोळ बाजारात उधारीवरील व्यवहारांना असलेल्या मर्यादा आणि परिणामी भाज्यांची घटलेली आवक यामुळे दरात ५० टक्क्यांची घसरण झाली आहे.

भाज्यांचे दर ५० टक्क्यांनी घसरले
ठाणे : सुट्या पैशांअभावी ग्राहकांची रोडावलेली संख्या, घाऊक व किरकोळ बाजारात उधारीवरील व्यवहारांना असलेल्या मर्यादा आणि परिणामी भाज्यांची घटलेली आवक यामुळे दरात ५० टक्क्यांची घसरण झाली आहे. दर कोसळूनही भाजी मार्केट ओस पडल्याचे विसंगत चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले.
सर्वसामान्यांना ‘अच्छे दिन’चे गाजर दाखवून नरेंद्र मोदी सत्तेवर आले. मात्र, सर्वसामान्यांच्या दैनंदिन जेवणातील भाज्यांच्या किमती कमी झाल्या नाहीत. अनेक भाज्यांचे दर कडाडल्याने ग्राहक गेले दोन वर्ष हैराण झाले आहेत. मात्र, बड्या नोटा रद्द केल्यानंतर सुट्या पैशांची चणचण जाणवू लागल्याने शेतकरी व घाऊक व्यापारी, घाऊक व किरकोळ व्यापारी तसेच किरकोळ व्यापारी व ग्राहक यांच्या खरेदी व्यवहारांत अडचणी येऊ लागल्या. परिणामी, उधारीवर भाजी खरेदी केली जाऊ लागली. त्याचा फटका बसून भाज्यांचे दर घसरले आहेत, असे जाणकारांनी सांगितले. गणेशोत्सव आणि दिवाळीच्या काळात भाज्यांचे दर गगनाला भिडले होते. आता ते कमी झाले असूनही ग्राहकांना लाभ झालेला नाही. (प्रतिनिधी)