शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

...तर राज्यभर कामबंद आंदोलन करणार, आदिवासी विकास विभागातील राजपत्रीत अधिकारी संघटनेचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 11:49 IST

संबंधित मागण्यांसंदर्भात गेल्या दोन वर्षापासून शासनास वारंवार निवेदने देण्यात आली असून प्रत्यक्ष भेट घेऊनही  मागण्यांसंदर्भात माहिती देण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे.

ठाणे - आदिवासी विकास विभागातील राजपत्रीत अधिकारी संघटनेने आदिवासी विकास विभागाशी संबंधित विवीध मागण्यांच्या अनुषंगाने कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. संबंधित मागण्यांसंदर्भात गेल्या दोन वर्षापासून शासनास वारंवार निवेदने देण्यात आली असून प्रत्यक्ष भेट घेऊनही  मागण्यांसंदर्भात माहिती देण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे.

संघटनेच्या वतीने, इतर विभागातील अधिकाऱ्यांना विभागात प्रतिनियुक्ती देण्यात येऊ नये, देण्यात आलेल्या प्रतिनियुक्त्या तात्काळ रद्द करण्यात याव्या, विभागातील रिक्त पदे कालबध्द पदोन्नतीने भरण्यात यावीत, अपर आयुक्त व उपायुक्त पदाचे सेवाशर्तीचे नियम तत्काळ तयार करण्यात यावेत, जमाती पडताळणीच्या दृष्टीने कायदा नियमात सुधारणा करण्यात यावी, मुदतपूर्व व नियमबाह्य बदल्या करण्यात येऊ नयेत, आदी मागण्यांचे निवेदन शासनास देण्यात आले आहे.

शासनाला निवेदन दिले असतानाही, संबंधित मागण्यांकडे दुर्लक्ष करत नव्याने इतर विभागातील अधिकाऱ्यांना या विभागात प्रतिनियुक्ती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे विभागातील अधिकाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना असून विभागाचे धोरण अन्यायकारक असल्याचे विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे.

तसेच, विभागात MPSC मार्फत निवड झालेले अधिकारी असतांना, विभागाचे सेवाप्रवेशाचे नियम निश्चित असतांना, आदिवासी विकास विभागामध्ये पुरेसे, सक्षम व अनुभवी अधिकारी असूनही इतर विभागातील अनुभव नसलेले आणि निम्न अहर्ता असेलेले अधिकारी या विभागात प्रतिनियुक्तीने लादले जात आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री, आदिवासी विकास विभागाचे मंत्री आणि सचिव यांना निवेदने सादर करण्यात आलेले असून या प्रतिनियुक्त्या न थांबल्यास संपूर्ण राज्यभर कामबंद आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी विकास विभागाच्या राजपत्रित अधिकारी संघटनेने दिला आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारthaneठाणेagitationआंदोलन