भिवंडीतील वऱ्हाळ तलाव जॉगर्स ट्रॅक बनला मद्यपींचा अड्डा; मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 18:59 IST2020-10-14T18:59:05+5:302020-10-14T18:59:19+5:30
उद्यानासह जॉगर्स ट्रॅककडे महानगरपालिका प्रशासन ,लोकप्रतिनिधी व उद्यान विभागाने दुर्लक्ष केल्याने या जॉगर्स ट्रॅक ठिकाणी झाड झुडपं वाढल्याने ही जागा चालणाऱ्यांसाठी नाही.

भिवंडीतील वऱ्हाळ तलाव जॉगर्स ट्रॅक बनला मद्यपींचा अड्डा; मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष
- नितिन पंडीत
भिवंडी: भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील उद्यानांची दुरवस्था झालेली असतानाच वऱ्हाळ तलावा भोवती बनविलेला जॉगर्स ट्रक सध्या मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे मद्यपींचा अड्डा बनला आहे. भिवंडी मनपाने २००७ च्या सुमारास तब्बल १७ कोटी खर्च करून वऱ्हाळ तलाव संवर्धन व सुशोभीकरण करण्यात आले त्यामध्ये या जॉगर्स ट्रॅकची बांधणी केली होती.
परंतु या उद्यानासह जॉगर्स ट्रॅककडे महानगरपालिका प्रशासन ,लोकप्रतिनिधी व उद्यान विभागाने दुर्लक्ष केल्याने या जॉगर्स ट्रॅक ठिकाणी झाड झुडपं वाढल्याने ही जागा चालणाऱ्यांसाठी नाही. तर आता मद्यपींसाठी सोयीस्कर बनली असून रात्री या ठिकाणी असंख्य मद्यपी मद्याचे घोट रिचवत असतांना पाहायला मिळतात तर सध्या सध्यायाया ठिकाणी दारुच्या रिकाम्या बाटल्या, चकण्याच्या प्लेटींचा खच पडलेलाच आहे. तसेच या तलावा शेजारील संरक्षक कट्टा ही बऱ्याच ठिकाणी कोसळल्याने हा जॉगर्स ट्रॅक धोकादायक ठरला आहे. मनपा प्रशासनाचे याकडे लक्ष जात नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त कर आहेत. विशेष म्हणजे या जॉगर्स ट्रॅकच्या बाजूलाच महानगरपालिका आयुक्तांचे निवासस्थान आहे मात्र आयुक्तांचे देखील या पडझडीकडे लक्ष जात नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.