वारकऱ्यांचा सुष्मा अंधारे यांच्या विरोधात लाँगमार्च 

By अजित मांडके | Updated: December 17, 2022 13:48 IST2022-12-17T13:41:40+5:302022-12-17T13:48:03+5:30

 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे  यांना त्यांनी म्हाताऱ्या म्हणून हिणवले होते.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज,प्रभू रामचंद्र, श्रीकृष्ण या सर्वांचा अपमान करुन खिल्ली उडविली त्यामुळे जनतेमध्ये नाराजी पसरली असून वारकऱ्यांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. 

Varakari long march against Sushma Andhare | वारकऱ्यांचा सुष्मा अंधारे यांच्या विरोधात लाँगमार्च 

वारकऱ्यांचा सुष्मा अंधारे यांच्या विरोधात लाँगमार्च 

ठाणे: शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गरळ ओकत आहेत. हिंदू धर्म व हिंदू देवदेवतांविरोधात अपमानास्पद वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करत आहे. जैनधर्मीयांच्या भावना देखील त्यांनी दुखावल्या आहेत. सुषमा अंधारे व त्यांना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांच्या विरोधात शनिवारी ठाण्यातील वारकरी समप्रदाय यांनी लॉंगमार्च काढला यावेळी हाती टाळ चिपळ्या घेत निषेध व्यक्त केला. या लॉंग मार्चमध्ये बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट आणि भाजपने देखील पाठिंबा दिल्याचे दिसून आले.

 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे  यांना त्यांनी म्हाताऱ्या म्हणून हिणवले होते.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज,प्रभू रामचंद्र, श्रीकृष्ण या सर्वांचा अपमान करुन खिल्ली उडविली त्यामुळे जनतेमध्ये नाराजी पसरली असून वारकऱ्यांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. 

    या सर्व गोष्टींच्या निषेधार्थ व त्यांना पाठीशी घालणाऱ्या त्यांचा बोलविता धनी यांच्या निषेधार्थ सर्व सामाजिक व धार्मिक संस्थांनी बंद पुकारला असून या बंदला  बाळासाहेबांच्या शिवसेनेचा तसेच महिला आघाडीचा पूर्ण पाठिंबा दिला असल्याचे शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी नमूद केले. तसेच यामध्ये भाजप देखील सहभागी झाल्याचे दिसून आले.
 
Web Title: Varakari long march against Sushma Andhare