निवडणुकीत वडापाव, कोल्ड्रिंक्स विक्रेत्यांची चांदी
By Admin | Updated: October 19, 2015 01:06 IST2015-10-19T01:06:51+5:302015-10-19T01:06:51+5:30
सध्या कल्याण डोंबिवली निवडणुकीचा धुराळा जोरात आहे. हजारो कार्यकर्ते घेऊन प्रत्येक पक्षाचे उमेदवार प्रचारासाठी फिरत आहेत.

निवडणुकीत वडापाव, कोल्ड्रिंक्स विक्रेत्यांची चांदी
उमेश जाधव, टिटवाळा
सध्या कल्याण डोंबिवली निवडणुकीचा धुराळा जोरात आहे. हजारो कार्यकर्ते घेऊन प्रत्येक पक्षाचे उमेदवार प्रचारासाठी फिरत आहेत. या सर्व कार्यकर्त्यांची नाश्ता- पाण्याची व्यवस्था करावी लागते. त्यामुळे सध्या वडापाव व कोल्ड्रिंक्स विक्र ेत्यांची चांदी झाली आहे.
या निवडणुकीत शिवसेना भाजपात फूट पडल्याने दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढविण्यास सज्ज झाले आहेत. तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करून लढत आहेत. तर मनसे स्वबळावर लढतआहे. सेना व भाजापाने आपल्या चुली वेगवेगळ्या मांडल्यामुळे यावेळची निवडणूक चौरंगी होणार आहे. त्यामुळे सेना भाजपाच्या उमेदवारास व कार्यकर्त्यांस जीव ओतून काम कराव लागणार आहे. याकरीता सध्या प्रत्येक उमेदवाराच्या बरोबर शक्ती प्रदर्शन करण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांची कुमक दिसून येते. यासर्वांना चहा, नाश्ता व पाणी लागत असतो. त्याकरीता वडापावच्या हातगाडीवर व कोल्ड्रिंक्सच्या दुकानात कमालीची गर्दी दिसून येते.