उल्हासनगर महापालिका हजेरी शेडची तोडफोड; अज्ञात इसमावर गुन्हा दाखल

By सदानंद नाईक | Published: April 20, 2024 06:18 PM2024-04-20T18:18:33+5:302024-04-20T18:18:44+5:30

हजेरी शेडच्या तोडफोड प्रकरणी आरोग्य स्वच्छता निरीक्षक विजय गावित यांच्या तक्रारी वरून विठ्ठलवाडी पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Vandalism of Ulhasnagar Municipal Attendance Shed; A case has been registered against an unknown person | उल्हासनगर महापालिका हजेरी शेडची तोडफोड; अज्ञात इसमावर गुन्हा दाखल

उल्हासनगर महापालिका हजेरी शेडची तोडफोड; अज्ञात इसमावर गुन्हा दाखल

 उल्हासनगर : कॅम्प नं-४ महात्मा फुलेनगर येथील महापालिका कर्मचारी हजेरी शेडची तोडफोड करून शेड मध्ये झाडाच्या फांद्या व कचरा टाकण्यात आला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमावर गुन्हा दाखल झाला आहे. 

उल्हासनगर महापालिका शाळा, शाळा मैदाने, समाजमंदिर, उद्याने, शौचालये व आता कर्मचारी हजेरी शेड भूमाफियांचा टार्गेटवर आहेत. कॅम्प नं-५, मच्छी मार्केट येथील महापालिका शाळा मैदानावर सनद काढल्याचा प्रकार थंड होत नाही, तोच कॅम्प नं-४, महात्मा फुलेनगर येथील महापालिका कर्मचारी हजेरी शेडची तोडफोड केल्याचा प्रकार उघड झाला. शेड मध्ये झाडाच्या फांद्या व कचरा टाकल्याने परिसरात दुर्गंधी पसरली. हजेरी शेडच्या तोडफोड प्रकरणी आरोग्य स्वच्छता निरीक्षक विजय गावित यांच्या तक्रारी वरून विठ्ठलवाडी पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Vandalism of Ulhasnagar Municipal Attendance Shed; A case has been registered against an unknown person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.