वामनराव वाळिंबे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:47 IST2021-09-04T04:47:22+5:302021-09-04T04:47:22+5:30

शहापूर : शहापूर तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष व तालुक्याचे ज्येष्ठ नेते वामनराव वाळिंबे (७५) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन ...

Vamanrao Walimbe passed away | वामनराव वाळिंबे यांचे निधन

वामनराव वाळिंबे यांचे निधन

शहापूर : शहापूर तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष व तालुक्याचे ज्येष्ठ नेते वामनराव वाळिंबे (७५) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांना तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अल्याणी गावचे सरपंच म्हणून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली हाेती.

तालुक्यातील एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून त्यांची ओळख होती. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार अशा विविध क्षेत्रांत त्यांचा वावर होता. ते ठाणे जिल्हा परिषदचे माजी सदस्य होते. १९९५ ते २००० या कालावधीत ते अल्याणी या गटातून निवडून आले होते. शहापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असताना त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी तालुक्यात पक्षाची उत्कृष्टरीत्या संघटनात्मक बांधणी केली होती. किसनबाबा भात सहकारी संस्थेचे व प्रगती शिक्षण मंडळाचे ते काहीकाळ चेअरमन होते. शहापुरातील ज्ञानवर्धिनी या शैक्षणिक संस्थेच्या कार्यकारी समितीची अध्यक्ष म्हणून त्यांनी धुरा सांभाळली होती. त्यांचे अंत्यसंस्कार अल्याणी गावात करण्यात आले असून विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.

Web Title: Vamanrao Walimbe passed away