शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
5
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
6
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
7
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
8
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
9
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
10
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
11
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
12
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
13
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
14
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
15
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
16
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
17
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'
18
शेअर असावा तर असा...! ₹15 वरून ₹455 वर पोहोचला शेअर, आता मोठा व्हिस्की ब्रँड खरेदी करणार कंपनी!
19
Ajit Pawar Birthday: अजित पवारांचा असाही एक कार्यकर्ता, ११ एकर शेतजमिनीवर दादांचे चित्र रेखाटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
20
२ मिनिटांत ₹१००० कोटींचा नफा; 'या' कंपनीच्या शेअरनं केली कमाल, मालकासह गुंतवणूकदारही मालमाल

व्हेल माशाची दोन कोटींची उलटी जप्त, दोन जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 07:21 IST

ठाण्यातून दोन जणांना अटक : आरोपींना १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

ठळक मुद्देवागळे इस्टेट परिसरातील रोड नंबर १६ येथील साउथ कोस्ट हॉटेल येथे मोटारसायकलीवरून दोघे जण व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी येत असल्याची माहिती श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण तांबे यांना मिळाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : अतिशय दुर्मीळ समजली जाणारी व्हेल माशाची उलटी बेकायदेशीररीत्या स्वत:जवळ बाळगून ती विक्रीसाठी आलेल्या एका दुकलीच्या श्रीनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून दोन कोटींहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुकलीला १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

वागळे इस्टेट परिसरातील रोड नंबर १६ येथील साउथ कोस्ट हॉटेल येथे मोटारसायकलीवरून दोघे जण व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी येत असल्याची माहिती श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण तांबे यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून चारकोप, कांदिवलीच्या मयूर देवीदास मोरे (३१) आणि अहमदनगर, जामखेडच्या प्रदीप अण्णा मोरे (३४) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती केली असता, त्यांच्याकडील बॅगमध्ये असलेल्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पिवळसर तांबट रंगाचे वेगवेगळ्या आकारांच्या दगडसदृश वस्तू आढळून आल्या. त्याचे वजन सुमारे ०२.०४८ कि.ग्रॅ. असून, ती व्हेल माशाची उलटी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ती उलटी मध्यस्थीच्या मदतीने २ कोटी रुपयांना विक्रीसाठी घेऊन आल्याचे त्यांनी सांगितले. या व्हेल माशाच्या उलटीसह दोन मोबाइल फोन आणि मोटारसायकल असा दोन कोटी २२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

काय आहे अंबरग्रीस व्हेल माशाच्या उलटीतून तयार होणाऱ्या दगडास अंबरग्रीस असे म्हटले जाते. अंबरग्रीसचा लहानसा खडाही शर्टावर चोळल्यास त्यातून निघणारा सुगंध महिनाभर टिकतो. परदेशातील सिगारेटमध्येही सुंगधासाठी अंबरग्रीसचा वापर होतो. त्यामुळे परदेशात अंबरग्रीसला मोठी मागणी आहे. गेल्या काही वर्षांपासून या अंबरग्रीसच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे.

टॅग्स :thaneठाणेfishermanमच्छीमारCrime Newsगुन्हेगारी