बदलापुरात सलग दुसऱ्या दिवशी लसीकरण बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:05 IST2021-05-05T05:05:58+5:302021-05-05T05:05:58+5:30
बदलापूर पालिकेच्या बाजूलाच असलेल्या दुबे रुग्णालयात लसीकरण केंद्र आहे. या केंद्रावर ३० एप्रिलला ८०० डोस आले होते. त्यापैकी ५१२ ...

बदलापुरात सलग दुसऱ्या दिवशी लसीकरण बंद
बदलापूर पालिकेच्या बाजूलाच असलेल्या दुबे रुग्णालयात लसीकरण केंद्र आहे. या केंद्रावर ३० एप्रिलला ८०० डोस आले होते. त्यापैकी ५१२ डोस ३० एप्रिलला संपले, तर उर्वरित २८८ डोस १ मे रोजी देण्यात आले. तेही काही तासांतच संपले. त्यानंतर मात्र बदलापुरात लसीचा पुरवठाच झालेला नाही. त्यामुळे अडीच दिवसांपासून बदलापुरातील लसीकरण केंद्र बंद आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह अनेकांना लसीकरण केंद्रावर येऊन परत जावे लागत आहे. हे कमी म्हणून की काय, लसीकरण केंद्रावरील कर्मचारी हे तिथे आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी उद्धटपणे वागत असून परिणामी ‘भीक नको, पण कुत्रा आवर’, असे म्हणण्याची वेळ बदलापूरकरांवर आली आहे. त्यामुळे बदलापूरकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
----------------------------------------------