शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आज लसीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:28 IST2021-09-02T05:28:17+5:302021-09-02T05:28:17+5:30

उल्हासनगर : महापालिका हद्दीतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी गुरुवारी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी बी. ...

Vaccination campaign today for teachers, non-teaching staff | शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आज लसीकरण मोहीम

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आज लसीकरण मोहीम

उल्हासनगर : महापालिका हद्दीतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी गुरुवारी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी बी. एन. मोहिते यांनी दिली. काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या अंजली साळवे यांनी आयुक्तांना पत्र देऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय लसीकरण मोहीम राबविण्याची विनंती केली होती. ३५९ जणांना पहिला डाेस देण्यात येणार आहे, तर दुसऱ्या डाेसला प्राधान्य देण्यात येणार आहे.

उल्हासनगरातील शाळा उघडण्यापूर्वी मुलांच्या सुरक्षेसाठी महापालिका, खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याची मागणी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या अंजली साळवे यांनी आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे केली होती. पालिका आयुक्त दयानिधी यांनी याबाबत आरोग्य विभागाशी चर्चा करून लसीकरणाला परवानगी दिली. आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रकाश जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक पगारे, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी. एन. मोहिते यांनी शिक्षकांच्या लसीकरणाला पुढाकार घेतला. गुरुवारी २ सप्टेंबरला महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर शहरातील सर्व अनुदानित व विनाअनुदानित शाळा व महापालिका शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या डोससाठी शिक्षकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी पगारे यांनी सांगितले. शिक्षकांनी गुरवारी आधार कार्ड व ओळखपत्र घेऊन लसीकरण केंद्रात जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मोहिते यांनी केले.

चौकट

महापालिकेचा कौतुकास्पद निर्णय

सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतल्याचे काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या अंजली साळवे या म्हणाल्या. गुरुवारी १०० टक्के शिक्षकांचे लसीकरण होणार असल्याने साळवे यांनी समाधान व्यक्त केले. शासनाने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचेही सुचविले आहे.

Web Title: Vaccination campaign today for teachers, non-teaching staff