ठाणे जिल्ह्यातील दिव्यांगांना प्राधान्याने लस द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST2021-06-16T04:51:54+5:302021-06-16T04:51:54+5:30

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना प्राधान्याने लसीकरण मोहिमेत सहभागी करून घ्यावे, या मागणीसाठी ठाणे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या ...

Vaccinate the disabled in Thane district with priority | ठाणे जिल्ह्यातील दिव्यांगांना प्राधान्याने लस द्या

ठाणे जिल्ह्यातील दिव्यांगांना प्राधान्याने लस द्या

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना प्राधान्याने लसीकरण मोहिमेत सहभागी करून घ्यावे, या मागणीसाठी ठाणे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड तसेच युवती प्रदेशाध्यक्षा कु. सक्षणाताई सलगर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, विरोधी पक्षनेते शानू पठाण, संघर्ष महिला संघ अध्यक्षा ऋता आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना प्राधान्याने लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेण्याबाबत निवेदन ठाणे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा पल्लवी शिवा जगताप यांच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना देण्यात आले.

कोरोना विषाणूला हरविण्यासाठी राज्य शासन व प्रशासन यांनी सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेचा लाभ दिव्यांग व्यक्तींनाही मिळाला पाहिजे. ज्यामध्ये दिव्यांग व्यक्तींची लसीकरणासाठी गैरसोय होऊ नये, त्यांना रांगेत उभे राहावे लागू नये, किंवा त्यांच्यासाठी आठवड्यातील एखादा दिवस राखीव असावा तसेच दिव्यांगांसाठी फिरती लसीकरण सेवा उपलब्ध व्हावी, अशी मागणी जगताप यांनी केली.

.........

वाचली

Web Title: Vaccinate the disabled in Thane district with priority