दुष्काळ नसला तरी पाणी जपून वापरा
By Admin | Updated: March 11, 2017 02:37 IST2017-03-11T02:37:57+5:302017-03-11T02:37:57+5:30
दरवर्षी धुलिवंदनाचा सण साजरा होण्यापूर्वीच अर्थात मार्च महिना उजाडण्यापूर्वी राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ लागलेली असते. मात्र, गेल्यावर्षी राज्यात पडलेल्या समाधानकारक

दुष्काळ नसला तरी पाणी जपून वापरा
ठाणे : दरवर्षी धुलिवंदनाचा सण साजरा होण्यापूर्वीच अर्थात मार्च महिना उजाडण्यापूर्वी राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ लागलेली असते. मात्र, गेल्यावर्षी राज्यात पडलेल्या समाधानकारक पावसामुळे अद्याप कुठेही दुष्काळसदृश्य परिस्थिती दिसत नसली तरी यंदाही धुलिवंदनासाठी पाण्याचा अनावश्यक वापर टाळण्याचे आवाहन पर्यावरण दक्षता मंचाने ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीच्या विविध शाळांमध्ये जनजागृती अभियानाच्या माध्यमातून केले आहे.
पर्यावरण दक्षता मंचातर्फे नैसर्गिक रंग ओले करू न धुळवड साजरी केली जात असे. मात्र, गेल्या काही वर्षातील पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता पाण्याचा वापर टाळून सुक्या आणि नैसर्गिक रंगांनी धुळवड खेळण्याचे आवाहन मंचाकडून केले जाते. त्याच पार्श्वभूमीवर यंदाही ठाण्यातील १५, कल्याण-डोंबिवलीतील १५ , टिटवाळ्यातील २ शाळा तसेच ठाण्यातील विविध सोसायट्यांत जनजागृती अभियान राबविण्यात आले. (प्रतिनिधी)