रुग्णवाहिकेत मुदत संपलेल्या औषधांचा वापर

By Admin | Updated: November 14, 2016 04:08 IST2016-11-14T04:08:47+5:302016-11-14T04:08:47+5:30

रुग्णांचा जीव वाचवण्याकरिता राज्य सरकारने सुरू केलेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका सेवेतील अनागोंदीचा नमुना उघड झाला आहे.

Use of terminated drugs in ambulance | रुग्णवाहिकेत मुदत संपलेल्या औषधांचा वापर

रुग्णवाहिकेत मुदत संपलेल्या औषधांचा वापर

प्रकाश जाधव / मुरबाड
रुग्णांचा जीव वाचवण्याकरिता राज्य सरकारने सुरू केलेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका सेवेतील अनागोंदीचा नमुना उघड झाला आहे. येथील रुग्णवाहिकेत रुग्णांवर प्रथमोपचार करण्याकरिता असलेले साहित्य हे मुदत उलटून गेलेले असल्याचे आढळून आले.
मुरबाडमधील ग्रामीण रुग्णालयातर्फे एमएच १४ सीएल १२८५ या क्रमांकाची रु ग्णवाहिका सेवेकरिता उपलब्ध आहे. मात्र, रु ग्णवाहिका सुरू झाल्यापासून त्यामधील उपलब्ध साहित्य न वापरल्याने अत्यावश्यक गोळ्या, स्पिरिट व रक्तदाबाच्या रुग्णांना द्यायच्या गोळ्या या मुदत संपलेल्या आहेत. साहजिकच, ही सेवा जीव वाचवण्याकरिता आहे की घेण्यासाठी आहे, असा संतप्त सवाल केला जात आहे.

Web Title: Use of terminated drugs in ambulance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.