सील केलेले गाळे वापरल्याने मालकावर गुन्हा

By Admin | Updated: March 21, 2017 01:55 IST2017-03-21T01:55:52+5:302017-03-21T01:55:52+5:30

मालमत्ताकर थकवल्याने गाळा जप्त करून तो सील केला असतानाही सील तोडून त्याचा पुन्हा वापर केल्याप्रकरणी महापालिकेने

Use of sealed sludge is a crime against the owner | सील केलेले गाळे वापरल्याने मालकावर गुन्हा

सील केलेले गाळे वापरल्याने मालकावर गुन्हा

मीरा रोड : मालमत्ताकर थकवल्याने गाळा जप्त करून तो सील केला असतानाही सील तोडून त्याचा पुन्हा वापर केल्याप्रकरणी महापालिकेने गाळेधारकाविरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मीरा-भार्इंदर महापालिकेने करवसुलीची जोरदार मोहीम सुरू केली असून मोठी थकबाकी असणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त करून त्या सील केल्या जात आहेत. आतापर्यंत पालिकेने सुमारे ३०० पेक्षा जास्त थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून त्याला सील ठोकले आहे.
भार्इंदर पूर्वेच्या प्रभाग समिती-४ मधील दोशी उद्योग मध्ये महाराजा स्पोटर््स या नावाने छोटा कारखाना चालतो. सदर व्यावसायिकाने महापालिकेचा गेल्या काही वर्षांपासून ८१ हजार ९१० रुपये इतका कर थकवला होता. कर भरण्यास सांगूनदेखील तो टोलवाटोलवी करीत होता.
अखेर, १८ मार्च २०१७ रोजी दुपारी पालिकेचे प्रभाग अधिकारी सुनील यादव यांनी सदरचा गाळा सील करीत जप्तीची नोटीस लावली. गाळा सील करून पालिकेचे पथक माघारी फिरत नाही, तोच अर्ध्या तासात गाळाधारकाने पालिकेचे सील तोडून पुन्हा कामकाज सुरू केले. याची माहिती मिळाल्यावर प्रभाग अधिकारी यादव यांनी ही बाब वरिष्ठांना कळवली. वरिष्ठांच्या आदेशानुसार अखेर रविवारी थकबाकीदार गाळेधारकाविरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात यादव यांनी फिर्याद दिली. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप आरोपीस अटक झालेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Use of sealed sludge is a crime against the owner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.