शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जास्तीत जास्त सोशल मीडियाचा वापर करा, राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 18:24 IST

दोन दिवसांच्या कल्याण-डोंबिवली दौ-यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त सोशल मीडियाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

ठळक मुद्देकल्याण-डोंबिवलीतील मनसे नगरसेवकांनी त्यांची कामे होत नसल्याचे गा-हाणे राज यांच्यासमोर मांडले. पराज वेगवेगळया जिल्ह्यात जाऊन नेते, पदाधिकारी, शाखाध्यक्षांच्या भेटी घेत आहेत.

डोंबिवली - दोन दिवसांच्या कल्याण-डोंबिवली दौ-यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त सोशल मीडियाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. सोशल मीडियाचा वापर करुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा आणि त्यांची काम करा असा सल्ला राज यांनी दिला. शुक्रवारी सकाळी  सर्वप्रथम राज डोंबिवलीत दाखल झाले. तिथे त्यांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन केले. 

कल्याण-डोंबिवलीतील मनसे नगरसेवकांनी त्यांची कामे होत नसल्याचे गा-हाणे राज यांच्यासमोर मांडले. पदावर राहून काम न करणा-या पदाधिका-यांना हटवण्याचा इशाराही त्यांनी दिला. लोकसभा, विधानसभेनंतर दोनवर्षांनी झालेल्या महापालिका निवडणुकीतही मनसेचा दारुण पराभव झाला. त्यानंतर अनेक नेते, कार्यकर्ते मनसे सोडून दुस-या पक्षात गेले. 

सध्या राज यांच्यासमोर पक्षाची पुर्नबांधणी करण्याचे आवाहन आहे. राज वेगवेगळया जिल्ह्यात जाऊन नेते, पदाधिकारी, शाखाध्यक्षांच्या भेटी घेत आहेत. राज ठाकरे यांनी डोंबिवलीतील सर्वेश हॉलमध्ये डोंबिवली मनसेचे गटाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष आणि शाखाध्यक्षांसोबत अंतर्गत बैठक घेतली. सभागृहात अन्य कोणत्याही पदाधिकाऱ्याला प्रवेश देण्यात आला नाही तसचं पोलिसांनाही बाहेर पाठवण्यात आलं. कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेचे नऊ नगरसेवक आहेत. त्यात सुनंदा कोट या नगरसेविकेने पक्षाला अंधारात ठेवून शिवसेनेच्या सहकार्याने प्रभाग अध्यक्ष पद पटकाविले आहे. यावर ठाकरे काही भाष्य अथवा निर्णय देतात का याकडेही लक्ष लागले आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे