रेल्वेतून ढकलल्याने यूपीच्या युवकाचा मृत्यू
By Admin | Updated: May 15, 2016 03:53 IST2016-05-15T03:53:52+5:302016-05-15T03:53:52+5:30
गर्दीच्या वेळी लोकलमधून पडण्याच्या घटनांना आळा घालण्याचे प्रयत्न सुरू असतानाच भल्या पहाटे गर्दी नसतानाही लोकलमधून अज्ञाताने ढकलल्यामुळे लोकलखाली सापडून अपघातात

रेल्वेतून ढकलल्याने यूपीच्या युवकाचा मृत्यू
डोंबिवली : गर्दीच्या वेळी लोकलमधून पडण्याच्या घटनांना आळा घालण्याचे प्रयत्न सुरू असतानाच भल्या पहाटे गर्दी नसतानाही लोकलमधून अज्ञाताने ढकलल्यामुळे लोकलखाली सापडून अपघातात त्या प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे ५.१५ च्या सुमारास कळवा स्थानकात घडल्याचे शनिवारी उघडकीस आले.
जगमोहन जैस्वाल (२३), रा. उत्तर प्रदेश असे मृत प्रवाशाचे नाव आहे. कळवा स्थानकात अप धीम्या फलाटावरून लोकल सुटल्यानंतर अनोळखी व्यक्तीने ढकलल्यानंतर जैस्वाल फलाटाखाली गेला. अपघात झाल्याचे समजताच स्थानक प्रशासनाने तातडीने त्याला बाहेर काढत प्रथमोपचार करून ठाण्याच्या रुग्णालयात पाठवले. त्यानंतर, त्याला पुढील उपचारासाठी जे. जे. इस्पितळात हलवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
ढकलून तो पडला आणि हा अपघात घडल्याचा प्रकार सीसी कॅमेऱ्यात बंदिस्त झाला असून त्यानुसार संबंधिताचा शोध सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.