विनापरवाना मंडप; १३७ मंडळांना नोटिसा
By Admin | Updated: October 1, 2015 01:53 IST2015-10-01T01:53:13+5:302015-10-01T01:53:13+5:30
सार्वजनिक गणेशोत्सव काळात विनापरवाना, विनाअर्ज मंडप थाटणाऱ्या तसेच दिलेली परवानगी मंडपाच्या दर्शनी भागावर प्रदर्शित न करणे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण

विनापरवाना मंडप; १३७ मंडळांना नोटिसा
ठाणे : सार्वजनिक गणेशोत्सव काळात विनापरवाना, विनाअर्ज मंडप थाटणाऱ्या तसेच दिलेली परवानगी मंडपाच्या दर्शनी भागावर प्रदर्शित न करणे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणे आदी कारणांस्तव तुर्भे (नवी मुंबई) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास उच्च न्यायालयाने केलेल्या दंडाच्या धर्तीवर ठाण्यातील जवळपास १३७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना १ लाख रु पये दंडाच्या नोटिसा देण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिल्या आहेत.
हा दंड नोटिसा प्राप्त झाल्यानंतर ४८ तासांत जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये भरण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. तसेच या दंडाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधी येथे भरून पावती घ्यावी. जी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे ४८ तासांत दंडाची रक्कम भरणार नाहीत, त्यांच्याविरु द्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
-----------
गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीत चालत्या वाहनांवर डॉल्बी डीजे सिस्टीम लावून त्यावर मोठ्या आवाजात गाणी वाजवून पोलिसांनी दिलेल्या परवानगीच्या अटी-शर्तींचा भंग केल्याने चार गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत.
विसर्जन मिरवणुकीत वाहनावर मोठ्या आवाजात डीजे लावल्याने भादवड मार्ग येथे नवीन दिवेकर व डीजेचालक, वेताळपाडा मार्ग येथे मनोज साळुंखे व डीजेचालक, गायत्रीनगर-फातमानगर मार्ग येथे नामदेव धुळे व डीजेचालक, इंदिरा गांधी रुग्णालय मार्गावर राजू कराळे व डीजेचालक यांच्याविरोधात शांतीनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.