शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर अभूतपूर्व 'भव सव्यसाची'*, प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 4:23 PM

प्रत्येक कट्टा प्रत्येक प्रयोग नवनवीन कलाकृती नवनवीन कलाकार नवनवीन विषय रसिकांसाठी अभिनय कट्ट्यावर सादर होतात. 

ठळक मुद्देअभिनय कट्ट्यावर अभूतपूर्व 'भव सव्यसाचीप्रत्येक कट्टा प्रत्येक प्रयोग नवनवीन कलाकृती नवनवीन कलाकार नवनवीन विषय रसिकांसाठीप्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

ठाणे : अभिनय कट्टा क्रमांक ४२१ वर  सुद्धा साकारला एका नवीन अभूतपूर्व  नाट्याविष्कार नवीन विषय नवीन कलाकार आणि उपस्थित प्रेक्षकांचे मनोरंजन. *आनंद प्रभू आयोजित आर्य प्रोडकशन निर्मित सव्यसाची देवबर्मन लिखित अन दिग्दर्शित 'भव सव्यसाची'.*         

     महाभारतातील प्रत्येक पात्राची भूमिका हि त्यांच्या जागी विशेष होती आणि महाभारताच्या परिणामांना प्रत्येक पात्राची भूमिका कारणीभूत  होती आणि त्यातील महत्वाचं पात्र श्री कृष्ण आणि अर्जुन म्हणजेच सव्यसाची. *सव्यसाची म्हणजे जो आपल्या दोन्ही हातानी प्रत्येक काम तितक्याच कुशल पद्धतीने करू शकतो. श्रीकृष्णाने भगवदगीतेतुन लढाईपासून परावृत्त झालेल्या अर्जुनाला जीवनाचा कर्म धर्म संयोगाचा मूलमंत्र सांगणारे तत्वज्ञान सांगितले.त्याचेच आधुनिक नाट्यमय रूपांतरण म्हणजे 'भव सव्यसाची '. *'भव सव्यसाची' मधील आधुनिक अर्जुन आधुनिक कृष्णाचे संभाषण हे  आजच्या युगात प्रत्येक क्षणाला प्रत्येक गोष्टीला अनुभवायला येणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचे विश्लेषण होते.फक्त ह्या संभाषणात अर्जुनाला गवसलेला मार्ग हा ह्या युगातील अर्जुनालाच नव्हे तर कृष्ण, भीष्म, धर्मासकट  प्रत्येकाला   जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी उपयोगी असा होता. सदर सादरीकरणात *अर्जुनाची भूमिका मनजीत ठाकूर आणि कृष्णाची भूमिका संदेश रामराजे* ह्यांनी साकारली.ह्या दोघांना सव्यसाची देवबर्मन ह्यांच्या अनुभवी दिग्दर्शनाची साथ लाभली. सदर सादरीकरणात *स्वप्नील गटवे ह्याने संगीत संयोजनाची* जबाबदारी सांभाळली. *'भव सव्यसाची' दीर्घांक  म्हणजे अभ्यासू लिखाण ,अनुभवी दिग्दर्शन आणि उत्तम अभिनय ह्या त्रिसूत्रीचा उत्तम नाट्याविष्कार.* सदर नाट्याविष्काराच्या निर्मितीची धुरा अनन्या नाटकाचे दिग्दर्शक प्रताप फड* ह्यांनी सांभाळलीय. अभिनय कट्टा म्हणजे कलाकारांना स्वतःच अस्तित्व जपण्यासाठी स्वतःच अस्तिव निर्माण करण्यासाठी एक उपयुक्त व्यासपीठ आहे.नवीन मेहनती कलाकार आणि अनुभवी दिग्दर्शक ह्या समीकरणाचे रंगमंचीय सादरीकरण  म्हणजे ,भव सव्यसाची. असे मत दिग्दर्शक  प्रताप फड ह्यांनी व्यक्त केले. *अभिनय कट्ट्यावर प्रत्येक कट्ट्यावर नव नवीन प्रयोग होतात .प्रत्येक नवीन कलाकृतीला नवीन कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे ह्याच उद्देशाने अभिनय कट्ट्याची स्थापना  झाली. कट्टा क्रमांक ४२१ वरील 'भव सव्यसाची'चा  आजचा प्रयोग हे त्याच प्रवासातील एक  अभूतपूर्व  सादरीकरण. अभ्यासू विषय त्याची उत्तम मांडणी अनुभवी दिग्दर्शक आणि नवीन कलाकार मिळून 'भव सव्यसाची ' ही  सुंदर  कलाकृती उभी केली आहे , असे मत अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष  किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले.  सदर अभिनय कट्टा क्रमांक ४२१ ची  सुरुवात लेखक दिग्दर्शक सव्यसाची देवबर्मन ह्यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे निवेदन किरण नाकती ह्यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक