ठाणे जि.प.च्या तिन्ही सभापतींची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:27 IST2021-07-20T04:27:38+5:302021-07-20T04:27:38+5:30

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीपदी भाजपच्या श्रेया गायकर यांची तर शिवसेनेचे प्रकाश तेलीवरे यांची ...

Unopposed election of three chairpersons of Thane ZP | ठाणे जि.प.च्या तिन्ही सभापतींची बिनविरोध निवड

ठाणे जि.प.च्या तिन्ही सभापतींची बिनविरोध निवड

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीपदी भाजपच्या श्रेया गायकर यांची तर शिवसेनेचे प्रकाश तेलीवरे यांची समाजकल्याण आणि वंदना भांडे यांची बांधकाम व आरोग्य समिती सभापतीपदी सोमवारी बिनविरोध निवड झाली.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. पीठासीन अधिकारी म्हणून ठाणे उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांनी कामकाज पाहिले. या निवडणूक प्रक्रियेकरिता ठाणे जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सदस्य सचिव अजिंक्य पवार उपस्थित होते. सभापतीपदी निवड झालेले प्रकाश तेलीवरे हे भिवंडी तालुक्यातील कांबे गटातून तर महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी निवड झालेल्या श्रेया गायकर या भिवंडी तालुक्यातील पडघा गटातून आणि विषय समिती सभापती पदी निवड झालेल्या वंदना भांडे या शहापूर तालुक्यातील गोठेघर गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. या नवनिर्वाचित सभापतींना ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा बोऱ्हाडे पाटील व उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी शुभेच्छा दिल्या.

-------

.

Web Title: Unopposed election of three chairpersons of Thane ZP