कल्याणमधील पोई आणि रोहन अंताडे ग्रामपंचायतची बिनविरोध निवडणुक; चवरे, दहागाव सरपंच पदासाठी चुरशीची लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 19:01 IST2019-08-23T18:44:51+5:302019-08-23T19:01:01+5:30
कल्याण तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका 31 ऑगस्ट रोजी होत असून या चार पैकी पोई व रोहन अंताडे ग्रामपंचतीच्या सरपंच पदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

कल्याणमधील पोई आणि रोहन अंताडे ग्रामपंचायतची बिनविरोध निवडणुक; चवरे, दहागाव सरपंच पदासाठी चुरशीची लढत
टिटवाळा: कल्याण तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका 31 ऑगस्ट रोजी होत असून या चार पैकी पोई व रोहन अंताडे ग्रामपंचतीच्या सरपंच पदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तर दहागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तसेच चवरे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी दोन उमेदवार निवडणूक रिगणात असल्याने येथे सरळ समळ लढत होणार आहे.
या चार ही ग्रामपंचायतींच्या सरपंचाच्या निवडणुका प्रथमच थेट जनतेतून होणार आहेत. यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या 31 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कल्याण तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकी पैकी पोई ग्रामपंचयतीच्या सरपंच पदी दिपा दिलीप बुटेरे यांची गावांतून बिनविरोध निवड झाली आहे.
या पंचायती मधील पाच सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत. तसेच रोहन अंताडे ग्रापंचायतीच्या सरपंच पदी सखाराम रोहणे यांची व सात सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. कल्याण तालुक्यातील दोन सरपंच पदासाठी व चार सदस्यांसाठी 31 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहेत.