टेम्पो उलटल्याने हमालाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 03:43 IST2017-08-19T03:43:45+5:302017-08-19T03:43:47+5:30

भिवंडी-ठाणे मार्गावरील रहानाळ गावच्या हद्दीतील होली मेरी स्कूलसमोर गुरुवारी मध्यरात्रीनंतर टेम्पो उलटून झालेल्या अपघातात सुरज पटेल या हमालाचा जागीच मृत झाला

Unlike tempo, the death of the hamma | टेम्पो उलटल्याने हमालाचा मृत्यू

टेम्पो उलटल्याने हमालाचा मृत्यू

भिवंडी : भिवंडी-ठाणे मार्गावरील रहानाळ गावच्या हद्दीतील होली मेरी स्कूलसमोर गुरुवारी मध्यरात्रीनंतर टेम्पो उलटून झालेल्या अपघातात सुरज पटेल या हमालाचा जागीच मृत झाला.
रात्री सव्वादोन वाजताच्या सुमारास दिनेश राजेंद्र गौड यांचा टेम्पो भिवंडीकडे चालला होता. भरधाव वेगाने जाणाºया टेम्पोचा चालक दिनेश गौड यांचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने तो रिक्षाला धडकला. त्यामुळे रिक्षाचे नुकसान होऊन रिक्षाचालक नीरज कमलेश केशरवानी हा जखमी झाला, तर पुढे रस्त्यामधील दुभाजकास टेम्पो आदळून टेम्पो उलटला.
टेम्पोच्या मागील बाजूस असलेला हमाल सुरज याला गंभीर दुखापत झाली आणि तो मरण पावला. अपघातात चालक दिनेश गौड जखमी झाले असून त्यांच्यासह रिक्षाचालक केशरवानी यांना रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातप्रकरणी रिक्षाचालकाने नारपोली पोलीस ठाण्यात टेम्पोचालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Unlike tempo, the death of the hamma