शहरं
Join us  
Trending Stories
1
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
2
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
3
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
4
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
5
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
6
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
7
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
8
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
9
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
10
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक
11
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
12
लग्नाच्या वर्षभरात योगिता चव्हाण-सौरभ चौघुलेच्या नात्यात दुरावा?, एकमेकांना केलं अनफॉलो, लग्नाचे फोटोही केले डिलीट
13
कॅनरा बँकेची गुंतवणूक असलेल्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; निव्वळ नफा २० टक्क्यांनी घटला
14
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
15
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
16
लठ्ठपणा कमी करण्यासाठी 'ब्रह्मास्त्र'; आरोग्य मंत्रालयाने फ्रीमध्ये सांगितली वजन घटवण्याची पद्धत
17
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
18
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
19
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
20
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले

विनापरवाना रिव्हॉल्व्हरमधून झाला ठाण्यातील ‘तो’ गोळीबार

By जितेंद्र कालेकर | Updated: December 19, 2018 22:01 IST

ठाण्याच्या किसननगर येथील एका गोदामामध्ये बसलेल्या तीन मित्रांपैकी अक्षय पवार याने झाडलेली गोळी ही अनावधानाने फायर झाल्याचा दावा त्याने केला आहे. दरम्यान, गोळी लागलेल्या विजय यादवच्या पोटातून शस्त्रक्रियेद्वारे एक काडतुस काढल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देशस्त्रक्रिया करून काढली पोटातील गोळीअनवधानाने गोळीबार झाल्याचा आरोपीचा दावाश्रीनगर पोलिसांनी केली कारवाई

ठाणे : किसननगर येथील एका गोदामामध्ये बसलेल्या अक्षय पवार याच्या हातून गावठी रिव्हॉल्व्हरमधून झालेला गोळीबार हा रिव्हॉल्व्हर हाताळताना नजरचुकीने झाल्याचा दावा त्याने श्रीनगर पोलिसांकडे केला आहे. त्याच्याकडे या रिव्हॉल्व्हरचा परवाना नसून त्याने ती कोणाकडून आणली, या सर्व बाबींचा पोलीस तपास करत आहेत. तर, गोळीबारात जखमी झालेल्या विजय यादव (२०) याच्यावर वर्तकनगर येथील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून त्याच्या पोटातून यशस्वीरीत्या गोळी काढल्याची माहिती सूत्रांनी दिली.अक्षय (रा. शिवशक्ती निवास, किसननगर, ठाणे), विजय आणि अवधेश यादव असे तिघे मित्र किसननगर येथील इस्टेट एजंट ऋषिकेश माने यांच्या गोदामामध्ये १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वा.च्या सुमारास बसले होते. त्याचवेळी अक्षयने आपल्याकडे एक रिव्हॉल्व्हर असल्याचे विजयला सांगितले. ती खोटी असावी, या शक्यतेने रिव्हॉल्व्हर बघण्याची उत्सुकता विजयनेही दाखवली. ती आपल्या मित्रांना दाखवताना निष्काळजीपणे हाताळल्यामुळे अक्षयच्या हातून गोळीबार झाल्याने विजयच्या पोटाला गोळी लागली. अक्षयने तातडीने त्याला वर्तकनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. रिव्हॉल्व्हर हाताळताना हा प्रकार घडल्याचा दावा अक्षयने पोलिसांकडे केला. तशीच माहिती विजय आणि अवधेश यांनीही दिली. पण, विनापरवाना त्याने ते हाताळले. शिवाय, पोलीस आयुक्तांचा मनाई आदेशाचा भंग करून ते स्वत:कडे बाळगले. त्याने ते कोणाकडून आणले, याची मात्र त्याच्याकडून योग्य माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. ते कचऱ्यात मिळाल्याचा दावा त्याने केला आहे. ते कच-यात मिळाले होते, तर त्याने ते पोलीस ठाण्यात जमा का केले नाही? किंवा याची त्याने पोलिसांना रीतसर माहिती का दिली नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याप्रकरणी विजयचा चुलत भाऊ संदीप यादव याने मंगळवारी रात्री ११ वा.च्या सुमारास तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक दिनकर चंदनकर यांच्या पथकाने अक्षयला अटक केली. त्याला २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. घटनास्थळी पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड, निरीक्षक सुनील पंधरकर आदींनी भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक दिनेश चव्हाण करत आहेत.-----------------

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीShootingगोळीबार