शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा भिवंडीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 22:08 IST

भिवंडी - भिवंडी लोकसभेचे खासदार असलेल्या कपिल पाटील यांची ७ जुलै रोजी केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागली असून त्याच्याकडे ...

भिवंडी- भिवंडी लोकसभेचे खासदार असलेल्या कपिल पाटील यांची ७ जुलै रोजी केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागली असून त्याच्याकडे केंद्रीय पंचायत राज मंत्री पदाचा कारभार सोपविण्यात आला आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर सर्व नवनिर्वाचित केंद्रीय मंत्र्यांनी १५ ऑगस्टपर्यंत दिल्लीतच राहून आपल्या खात्याविषयी माहिती घ्यावी, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्यानंतर केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील हे तब्बल चाळीस दिवसांनंतर १६ ऑगस्ट रोजी मुंबईत परतले. १६ ते २० ऑगस्ट, अशी पाच दिवस जन आशीर्वाद यात्रा आहे. मुंबईहून सुरू झालेली ही यात्रा ठाणे, रायगड जिल्ह्यातून जात आहे. या यात्रेसोबत पाटील हे गुरुवारी तब्बल 44 दिवसांनंतर भिवंडीत दाखल झाले. 

गुरुवारी सायंकाळी कपिल पाटील भिवंडीत दाखल झाले . सायंकाळी मुंबई नाशिक महामार्गावर वडपे गावाच्या हद्दीत भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनतर रांजणोली नाका येथे भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केल्यानंतर त्यांनी साईबाबा मंदिरात साईंचे दर्शन घेत पुढे नवी वस्ती, धर्मवीर चौक, जुनी महापालिका येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करत वंजारपट्टीनाका मार्गे छ. शिवाजी महाराज चौक येथे छ. शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर टिळक चौक , मंडई , गौरी पाडा , धामणकर नाका , कामतघर , ताडाळी मार्गे अंजूरफाटा, अशी जण आशीर्वाद यात्रा संपन्न झाली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोषात कपिल पाटील यांचे स्वागत केले.

गुरुवारी दिवसभर पावसाने रिमझिम हजेरी लावली असतांनाही भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने कपिल पाटील यांचे भिवंडी शहरात स्वागत केले. तर रिमझिम पावसामुळे मंत्री कपिल पाटील यांनी रेनकोट परिधान करून शहरवासीयांचे आशीर्वाद घेतले. दरम्यान या जन आशीर्वाद यात्रेमुळे शहरात ठिकठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती, तर भिवंडी पोलिसांच्या वतीने शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.           

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलBJPभाजपाbhiwandiभिवंडी