विनाचावी दुचाकी चोरणारा ताब्यात

By Admin | Updated: May 11, 2017 02:00 IST2017-05-11T02:00:47+5:302017-05-11T02:00:47+5:30

चावीशिवाय दुचाकी सुरू करून त्या चोरण्यात माहीर असलेल्या १७ वर्षांच्या तरुणाला कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Uninvited bike thief detained | विनाचावी दुचाकी चोरणारा ताब्यात

विनाचावी दुचाकी चोरणारा ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : चावीशिवाय दुचाकी सुरू करून त्या चोरण्यात माहीर असलेल्या १७ वर्षांच्या तरुणाला कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, त्याचा साथीदार सिकंदर शेख याचा पोलीस शोध घेत आहेत. अल्पवयीन चोरट्याकडून ९ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या असून आतापर्यंत या दुकलीने ७० दुचाकी चोरल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती आली आहे.
भिवंडीतील दोन तरुण चोरीच्या दुचाकी विकत असल्याची माहिती कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर व विजय खेडेकर यांच्या पथकाने भिवंडी गाठली. तेथे त्यांनी अल्पवयीन चोरट्याला प्रथम ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार सिकंदर शेखची माहिती दिली. मात्र, शेख हा पसार झाला आहे. गाड्या नेमक्या कुठून, कधी चोरल्या याची माहिती अल्पवयीन चोरट्याला सांगता येत नाही. सिकंदरला ते सगळे ठाऊक असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलीस सिकंदरचा शोध घेत आहेत. सिंकदरला अटक झाल्यावर अन्य चोरी केलेल्या गाड्यांचे गुन्हे उघडकीस होण्यास मदत होऊ शकते.
हवाई सफर करून चोरी करणाऱ्या चोराच्या कारवाईनंतर हा अल्पवयीन चोरटा पोलिसांच्या हाती लागला आहे.

Web Title: Uninvited bike thief detained