शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
2
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
3
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
5
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
6
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
7
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
8
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
9
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
10
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
11
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
12
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
13
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
14
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
15
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
16
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
17
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
18
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
19
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
20
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
Daily Top 2Weekly Top 5

आकाश पाळण्यातून पडून नऊ वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 22:09 IST

भिवंडी : रमजान ईद निमीत्ताने शहरातील समदनगरमध्ये भरलेल्या खेळण्यांच्या जत्रेत आकाश पाळण्यातून पडून नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी ...

ठळक मुद्देमुस्कानचा तोल गेल्यानंतर ती पाळण्यातून पडून जखमीरमजान ईद निमीत्ताने खेळण्याच्या जत्रेत गेली मुस्कानपाळण्याच्या चालकाच्या हलगर्जीपणाने झाला घात

भिवंडी : रमजान ईद निमीत्ताने शहरातील समदनगरमध्ये भरलेल्या खेळण्यांच्या जत्रेत आकाश पाळण्यातून पडून नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने तीच्या कुटूंबासह परिसरांत ईदच्या सणांतच शोककळा पसरली.मुस्कान मोहम्मद शमीम सिध्दीकी (९) असे मयत मुलीचे नांव असून ती काप तलाव जैतूनपुरा या भागात आपल्या आईवडीलांसोबत रहात होती. मुस्लिम बांधवांमध्ये रमजान ईद हा सण दिवाळीप्रमाणे साजरा करतात. त्यामुळे लहान मुलांची चंगळ असते. ईदच्या निमीत्ताने घरी आलेले पाहूणे,नातेवाईक यांच्यासह आईवडील देखील आपल्या मुलांना खाऊसाठी पैसे(ईदी)देतात. या पैश्यांतून हौसमौज करण्यासाठी सायंकाळी मुले घराबाहेर पडतात.त्याप्रमाणे काल बुधवार रोजी रमजान ईदच्या निमीत्ताने सायंकाळी चार वाजताच्या सुमारास जैतूनपुरा कापतलाव येथील मुस्कान ही नऊ वर्षाची मुलगी आपल्या चुलत बहिणीसोबत समदनगर येथील भरलेल्या खेळण्यांच्या जत्रेत गेली. तेथे हाताने फिरविल्या जाणाऱ्या छोट्या आकाश पाळण्यात ती बसल्यानंतर पाळणा फिरताना तो वर गेला .त्यामुळे घाबरून तीचा तोल जाऊन ती खाली पडली. ती वरून खाली पडत असताना पाळण्याच्या खांबावर आदळून तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. त्यामुळे जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात ती पडली. ही घटना घडल्यानंतर पाळणा चालविणाºया चालकाने तीला पाळण्याजवळ जमीनीवर ठेऊन तेथुन पलायन केले.या घटनेची माहिती तेथील मुलांनी मुस्कानच्या घरी दिल्यानंतर तीच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेत जखमी मुस्कानला स्व.इंदिरागांधी स्मृती रूग्णालयांत उपचारासाठी दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तीचा उपचारापुर्वी मृत्यू झाल्याचे सांगीतले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हाताने आकाश पाळणा फिरविणाºया चालकाने खबरदारी घेत तात्काळ पाळणा थांबवून मुलीला वैद्यकीय मदत दिली असता तर आपली मुलगी बचावली असती. पाळणा चालकाच्या हलगर्जीपणामुळे तीचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत मुस्कानचे वडील मोहम्मद शमीम सिध्दीकी यांनी केला आहे.हाताने धक्का देत चालविल्या जाणाºया आकाश पाळण्यास धक्का देण्यासाठी पाळणा चालक वरती चढून पाळण्यास लटकत खाली येत पुन्हा वर चढून पाळण्यास लटकत जोरात धक्का देत होता. हे करीत असताना पाळण्यात बसलेली मुस्कान हिचे डोके लोखंडी खांबावर आदळत ते पाळण्यात अटकल्याने ती जखमी होऊन तिचा डोक्यातून रक्तस्त्राव सुरू होता. पाळणा चालकाने तिला जखमी अवस्थेत खाली उतरवून तेथेच मातीत झोपवून त्याने पलायन केले,अशी माहिती प्रत्यक्षदर्शी महेफुज अन्सारी व रूबिना या मुलांनी सांगितली आहे .

टॅग्स :BhiwandiभिवंडीAccidentअपघात