शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीला निघालेल्या दांपत्याचा अपघाती मृत्यू;चिमुकली बचावली

By नितीन पंडित | Updated: December 30, 2022 17:39 IST

Accident: नववर्षाच्या स्वागताकरीता शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी मुंबई भांडुप येथुन दुचाकी वरून निघालेल्या दांपत्याच्या दुचाकीला भिवंडी परिसरातील मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती पत्नी दोघांचेही दुर्दैवी निधन झाले आहे.

- नितीन पंडित भिवंडी  - नववर्षाच्या स्वागताकरीता शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी मुंबई भांडुप येथुन दुचाकी वरून निघालेल्या दांपत्याच्या दुचाकीला भिवंडी परिसरातील मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती पत्नी दोघांचेही दुर्दैवी निधन झाले आहे.सुदैवाने या  अपघातामध्ये दुचाकी वरील सहा वर्षाची चिमुकली मृण्मयी बचावली असून ती सुखरूप आहे.

 मनोज सोमा जोशी वय ३६ व मानसी मनोज जोशी वय ३४ रा.तानाजी वाडी,टेंभीपाडा भांडुप पश्चिम असे मयत दांपत्याचे नाव आहे. भांडुप पश्चिम येथील तानाजी वाडी चाळीतील रहिवाशांनी नववर्षात साईबाबांच्या दर्शनाचा बेत आखला होता.व त्यासाठी शुक्रवारी तेथील असंख्य कुटुंबीय दुचाकीवर तर काही मिनी बस मधून शिर्डी येथे जाण्याकरता सकाळी साडेसात वाजता निघाले.या चाळीतील मनोज जोशी व त्यांची पत्नी मानसी व मुलगी मृण्मयी असे तिघे आपल्या सुझुकी एक्सेस मोटर सायकलने शिर्डी दर्शन करता निघाले असता, भिवंडी तालुका पोलीस ठाणे हद्दीत मुंबई नाशिक महामार्गावर येवई ते वडपा यादरम्यान नाशिकच्या दिशेने जात असताना एका कंटेनरच्या चालकाने कंटेनर भरधाव बेजबाबदारपणे चालवुन दुचाकीस मागून धडक दिली.ज्यामध्ये दुचाकीवरील हे जोशी दाम्पत्य कंटेनरच्या मागील चाकात आले आणि घटना स्थळीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.सुदैवाने त्यांची सहा वर्षाची चिमुकली मृण्मयी ही गाडीवरून विरुद्ध दिशेला पडल्यामुळे तिला कोणतीही दुखापत न होता ती या अपघातातून बचावली आहे.

 या घटने नंतर भिवंडी तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे हे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होत त्यांनी कंटेनर चालक कपिल राजाराम देव यास ताब्यात घेतले.घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केले.तर मनोज जोशी या सोबत निघालेला शेजारी विक्रांत पायरे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून कंटेनर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या अपघात गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे हे करीत असून या दुर्दैवी अपघाती घटनेनंतर अनेकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Accidentअपघातbhiwandiभिवंडी