बेरोजगार तरुणांना गंडा, महिला गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:49 IST2021-09-10T04:49:10+5:302021-09-10T04:49:10+5:30

कल्याण : जहाज कंपनीत नोकरी लावण्याच्या नावाखाली बेरोजगार तरुणांना १२ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या मानसी खंडेलवाल (४१) हिला गुरुवारी ...

Unemployed youth ganga, women gajaad | बेरोजगार तरुणांना गंडा, महिला गजाआड

बेरोजगार तरुणांना गंडा, महिला गजाआड

कल्याण : जहाज कंपनीत नोकरी लावण्याच्या नावाखाली बेरोजगार तरुणांना १२ लाख रुपयाचा गंडा घालणाऱ्या मानसी खंडेलवाल (४१) हिला गुरुवारी अखेर तीन महिन्यानंतर अटक करण्यात आली. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने तिला दोन दिवसाची कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे या तरुणीला अटक करण्यासाठी गेलेल्या खडकपाडा पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती. पोलीस दोन तास तिच्या घराबाहेर उभे होते. कारण तरुणी आणि तिची आई बाहेरून दरवाजाला कुलूप लावून आत बसल्या होत्या. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार त्यांचे बिंग फुटले. अटक आरोपी मानसी हिच्यासह तिची आई राघिणी हिच्यावर मुंबईतील अंधेरी, सहार, खार आणि कल्याणच्या बाजारपेठ व खडकपाडा पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे विविध गुन्हे दाखल आहेत. सध्या तिची आई जामिनावर बाहेर आहे.

----------------------

Web Title: Unemployed youth ganga, women gajaad