लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: अविवाहित असल्याने नैराश्येपोटी अशोक कांबळे (४८, रा. एनजी विहार, लोकमान्यनगर, ठाणे) याने इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशोक हा त्याचा मोठा भाऊ जनार्दन कांबळे यांच्यासह एनजी विहार कॉम्पलेक्समध्ये वास्तव्याला होता. त्याला कोणताही कामधंदा नव्हता. त्यातच त्याचा विवाह देखिल झालेला नव्हता. यातून तो गेल्या अनेक दिवसांपासून वैफल्यग्रस्त होता. याच वैफल्यातून त्याने एनजी विहार कॉम्पलेक्सच्या आठव्या मजल्यावरील गच्चीवरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३१ मार्च रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. त्याचा मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुहास हट्टेकर याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
ठाण्यात आठव्या मजल्यावरुन झोकून देत बेरोजगाराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 19:44 IST
बेरोजगारीमुळे लग्नही जमत नसल्यामुळे अशोक कांबळे या ४८ वर्षीय व्यक्तीने एनजी विहार कॉम्पलेक्सच्या आठव्या मजल्यावरील गच्चीवरुन स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली.
ठाण्यात आठव्या मजल्यावरुन झोकून देत बेरोजगाराची आत्महत्या
ठळक मुद्देअविवाहित असल्यानेही आले होते नैराश्यवर्तकनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक गुन्हयाची नोंद