ठाण्यात दोन ठिकाणी पाण्याची भूमीगत जलवाहिनी फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2022 17:10 IST2022-06-05T17:09:52+5:302022-06-05T17:10:02+5:30
पहिली घटना उपवन तलावाजवळ सकाळी ८.२५ वाजण्याच्या सुमारास घडली. याठिकाणी जलवाहिनी फुटल्यामुळे पाण्याचा प्रवाह उपवन तलावामध्ये गेला.

ठाण्यात दोन ठिकाणी पाण्याची भूमीगत जलवाहिनी फुटली
ठाणे: उपवन आणि कळवा खारेगाव या ठिकाणी रविवारी दिवसभरात पाण्याच्या दोन वेगवेगळ्या भूमिगत वाहिन्या फुटल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनांमध्ये मोठया प्रमाणात पाण्याची गळती झाली.
पहिली घटना उपवन तलावाजवळ सकाळी ८.२५ वाजण्याच्या सुमारास घडली. याठिकाणी जलवाहिनी फुटल्यामुळे पाण्याचा प्रवाह उपवन तलावामध्ये गेला. या पाण्याच्या प्रवाहामुळे महापौर निवासासमोर मोठया प्रमाणात दलदल निर्माण झाली होती. तर दुसरी घटना कळवा येथील खारेगाव पाखाडी येथील विठ्ठल मंदिरासमोर रविवारी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्येही कोणालाही जिवित हानी किंवा दुखापत झालेली नाही. या दोन्ही ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभागासह ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील कर्मचाºयांनी धाव घेऊन तातडीने दुरुस्तीचे काम पूर्ण केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उपवन आणि कळवा खारेगाव या ठिकाणी रविवारी दिवसभरात पाण्याच्या दोन वेगवेगळ्या भूमिगत वाहिन्या फुटल्याच्या घटना घडल्या #Thanepic.twitter.com/shODa6t8Kf
— Lokmat (@lokmat) June 5, 2022