उल्हासनगरला भुयारी गटारे ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:55 IST2021-02-26T04:55:45+5:302021-02-26T04:55:45+5:30

-------------------------- अनधिकृत जाहिरातफलक लावणाऱ्या तिघांवर गुन्हा उल्हासनगर : महापालिका प्रभाग समिती क्रं-४ च्या हद्दीत अनधिकृतपणे जाहिरातफलक लावणाऱ्या तिघां जणांविरोधात ...

Underground sewers overflow to Ulhasnagar | उल्हासनगरला भुयारी गटारे ओव्हरफ्लो

उल्हासनगरला भुयारी गटारे ओव्हरफ्लो

--------------------------

अनधिकृत जाहिरातफलक लावणाऱ्या तिघांवर गुन्हा

उल्हासनगर : महापालिका प्रभाग समिती क्रं-४ च्या हद्दीत अनधिकृतपणे जाहिरातफलक लावणाऱ्या तिघां जणांविरोधात हिललाइन पोलीस ठाण्यात महापालिकेचे सहायक आयुक्त अजय एडके यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, कारवाईचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.

--------------------------

ट्रकखाली चिरडून महिलेचा मृत्यू

उल्हासनगर : नेवाळी ते डावलपाडा रस्त्यादरम्यान प्रितम यादव हे लहान भाऊ व आईसह दुचाकीवरून मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता जात होते. त्यावेळी मागून आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेने खाली पडलेल्या तिघांपैकी सुनीता उमेश यादव यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने, त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर लहान भाऊ जखमी झाला. याप्रकरणी हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.

------------

Web Title: Underground sewers overflow to Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.