लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : फ्लोअरिंगच्या बेकायदेशीर बांधकामामुळे घराचे छत कमकुवत होऊन बबलू भरत घोष (५३) यांचा मृत्यू झाला होता. त्यांची पत्नी बाणी घोष (४६) या गंभीर जखमी होऊन ८० टक्के अपंग झाल्या होत्या. याप्रकरणी दोन वर्षांनी या दाम्पत्याचा मुलगा अमित घोष (२९, बी.आर.नगर, दिवा, ठाणे) यांच्या तक्रारीवरून श्रीनगर पोलीस ठाण्यात शनिवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.दिवा येथील अमित घोष हे किसननगर येथे विजय निवास या पाच मजली इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेमध्ये वर्षभरापूर्वी वास्तव्याला होते. त्यांच्या २०१ क्रमांकाच्या खोलीवर रजनीकांत पाठारे हे ३०१ क्रमांकाच्या खोलीमध्ये वास्तव्याला होते. पाठारे हेच या इमारतीचे बिल्डर आणि मालकही आहेत. २०१७ मध्ये घोष यांच्या घराच्या छताला भेगा पडून गळतीही लागलेली होती. ही बाब त्यांनी पाठारे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. पाठारे यांनी या बाबीकडे दुर्लक्ष करीत उलट त्यांनी त्यांच्या फ्लोअरिंगचे दोन ते तीनवेळा विनापरवाना काम केले. त्यावर अतिरिक्त बांधकामही केले. त्यामुळे घोष यांच्या छतावर अतिरिक्त वजन वाढून ते कमकुवत झाले होते. ही बाबही घोष यांनी पाठारे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केले होते.दरम्यान, २४ नोव्हेंबर २०१७ रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घोष यांच्या घराचे छत अचानक कोसळले. त्याच्या ढिगाºयाखाली दबल्याने अमित यांचे वडील भरत यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आई बाणी यांच्या डाव्या पायाला व डोक्याला जबर मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. या घटनेमध्ये घोष यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील नीना आणि यास्मिन पाठारे याही खाली पडून जखमी झाल्या होत्या. बबलू यांच्या मृत्यूप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेतली होती. बाणी यांचा डावा पाय निकामी झाल्यामुळे शस्त्रक्रिया करून तो काढावा लागला होता. यात त्या ८० टक्के अपंग झाल्या आहेत. या गंभीर प्रसंगातून सावरण्यास अवधी गेल्याने बबलू यांचा मुलगा अमित घोष यांनी याप्रकरणी १५ फेब्रुवारी २०२० रोजी म्हणजे तब्बल दोन वर्षांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक दिनकर चंदनकर यांनी सांगितले.
फ्लोअरिंगचे विनापरवाना बांधकाम: रहिवाशाच्या मृत्यूप्रकरणी दोन वर्षांनी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 22:43 IST
घराच्या छताला भेगा पडून गळतीही लागलेली असल्याची बाब निदर्शनास आणूनही इमारतीचा मालक तथा बिल्डर रजनीकांत पाठारे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या फ्लोअरिंगचे बेकायदेशीरपणे काम केले. यातूनच छत कमकुवत झाल्याने बबलू भरत घोष (५३) यांचा मृत्यू झाला होता. दोन वर्षांपूर्वीच्या या घटनेप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पाठारे यांच्याविरुद्ध दोन वर्षांनी दाखल झाला आहे.
फ्लोअरिंगचे विनापरवाना बांधकाम: रहिवाशाच्या मृत्यूप्रकरणी दोन वर्षांनी गुन्हा दाखल
ठळक मुद्दे घराच्या छताला गळतीही लागल्याची बाब निदर्शनास आणूनही केले दुर्लक्षबिल्डरविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा