अनधिकृत बॅनरचा जाब विचारणाऱ्यालाच मारहाण
By Admin | Updated: October 24, 2015 01:16 IST2015-10-24T01:16:15+5:302015-10-24T01:16:15+5:30
राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भाडेतत्त्वावरील जागेत अनधिकृतपणे बॅनर लावणाऱ्यांना जाब विचारणाऱ्या राहुल सिर्के यांनाच तिघांनी करून मारहाण

अनधिकृत बॅनरचा जाब विचारणाऱ्यालाच मारहाण
ठाणे : राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भाडेतत्त्वावरील जागेत अनधिकृतपणे बॅनर लावणाऱ्यांना जाब विचारणाऱ्या राहुल सिर्के यांनाच तिघांनी करून मारहाण केल्याची घटना २२ आॅक्टोबर रोजी पहाटे ३ वा.च्या सुमारास घडली. याप्रकरणी सुनील सुर्वे, मिलिंद सिंदरकर आणि हेमंत भोसले या तिघा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कळवा पोलिसांनी अटक करून नंतर त्यांची जामिनावर सुटका केली.
जाहिरातीचा व्यवसाय करणाऱ्या सिर्के यांचा कळवा नाक्यावर अधिकृत होर्डिंग्जचा बोर्ड आहे. त्या बोर्डच्या शिडीच्या दरवाजाचे कुलूप तोडून तिथे आधी असलेले बॅनर फाडून या तिघांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक मिलिंद पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर लावले. ते लावण्यास सिर्कें नी हरकत घेतल्यानंतर त्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. २२ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वा.च्या सुमारास याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. ठाणे महापालिका हद्दीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून असे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी असून कोणी दहशतीमुळे पोलिसांत जात नसल्याने त्यांचे फावत आहे.